प्रभाग-६ जरीपटका-३
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
नागरिकांच्या प्रतिक्रिया --------- नळ आहे पण पाणी नाही- अशोक तेजवानी जरीपटका मुख्य बाजार परिसरात नळाची लाईन आहे. परंतु त्याला पाणी नाही. बोअरवेलवर अवलंबून राहावे लागते. नळाला मीटर नव्हते. दोन वर्षांपूर्वीच मीटर लावण्यात आले. परंतु १३ वर्षांपासूनच बिल पाठवण्यात आले आहे. त्याबाबत तक्रार दिली आहे. मात्र काहीच कारवाई झाली नाही. किमान ...
प्रभाग-६ जरीपटका-३
नागरिकांच्या प्रतिक्रिया --------- नळ आहे पण पाणी नाही- अशोक तेजवानी जरीपटका मुख्य बाजार परिसरात नळाची लाईन आहे. परंतु त्याला पाणी नाही. बोअरवेलवर अवलंबून राहावे लागते. नळाला मीटर नव्हते. दोन वर्षांपूर्वीच मीटर लावण्यात आले. परंतु १३ वर्षांपासूनच बिल पाठवण्यात आले आहे. त्याबाबत तक्रार दिली आहे. मात्र काहीच कारवाई झाली नाही. किमान नळाला पाणी यावे, ही अपेक्षा आहे. रस्त्यावरील नाल्या बुजलेल्या- साधुराम टीलवानी जरीपटका प्रभागात सर्वत्रच अस्वच्छता आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला नाल्या बांधल्या आहेत. मात्र त्या कधी साफच झाल्या नाहीत. त्यामुळे त्या जवळपास बुजलेल्या आहेत. कचरा उघड्यावरच टाकला जातो. साफसफाई करणारे फारसे फिरकत नाहीत. विकासाच्या नावावर बोंब - हिराप्रसाद दुबे विकासाच्या खूप गोष्टी ऐकायला मिळतात. परंतु आमच्या वस्तीत विकासाचा प्रकाश अजून आलेलाच नाही. २५ वर्षांपूर्वी बांधलेला रस्ता नंतर कधी दुरुस्त झालाच नाही. लवकरच रस्त्याचे काम होणार असल्याचे ऐेकायला मिळत आहे, परंतु अजून तरी सुरुवात झाल्याचे दिसत नाही. रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. पाण्याची गरज पूर्ण करावी तरी कशी - सविता आखरे जुना जरीपटका भागात नळाची लाईन अतिशय खोलवर आहे. त्यातही पूर्ण दाबाने पाणी येत नाही. तासभर नळ राहतो,. अशा वेळी पाण्याची गरज पूर्ण करावी तरी कशी, असा प्रश्न आहे. नाईलाजास्तव मोटारपंप लावून पाणी भरावे लागते. सफाई कर्मचारी दिसतच नाही - दीपक दीक्षित आमच्या वस्तीत सर्वत्रच अस्वच्छतेचे वातावरण आहे. सफाई करणारे कर्मचारी तर कधी दिसतच नाही. त्यामुळे सफाई होणार तरी कशी. सफाई कर्मचारी दररोज सफाई करतील, अशी ताकीद प्रशासनाने त्यांना द्यावी. रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे - राजू तकतानी जुना जरीपटका येथील रस्ता अतिशय दयनीय झाला आहे. त्यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच स्वच्छतेवर अधिक भर दिला जावा. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी - प्रेम सोनकर जुना जरीपटका भागात अनेक सार्वजनिक शौचालये आहेत. याचा वापर आजही केला जातो. परंतु शौचालयांची दयनीय अवस्था झाली आहे. दरवाजे तुटलेले आहेत. स्वच्छता होत नाही. त्यामुळे येथील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी.