प्रभाग -३ गरीबनवाजनगर -५
By admin | Updated: January 22, 2015 00:06 IST
- नियमित स्वच्छता व्हावी - जरीना बानो
प्रभाग -३ गरीबनवाजनगर -५
- नियमित स्वच्छता व्हावी - जरीना बानो आमच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण आहेत. नियमित स्वच्छता होत नाही. वस्तीत तर सफाई करणारे येऊनही पाहत नाही. तेव्हा किमान नियमित स्वच्छता तरी करण्यात यावी. तसेच येथील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. शासकीय रुग्णालय व्हावे - शेख वाहिद हा परिसर मुख्य शहरापासून खूप लांब आहे. परिसरात एकही शासकीय रुग्णालय नाही. येथील नागरिकांना मेयो रुग्णालयात जावे लागते. महापालिकेने या परिसरात एखादे मनपा रुग्णालय सुरू करावे. मैदानाचा विकास व्हावा - मो. शारीक परिसरात एकमेव मैदान आहे. अतिशय भव्य असे मैदान आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाचा विकास झाल्यास मुलांसह परिसरातील नागरिकांनाही त्याचा लाभ घेता येईल. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर - सुरेश तळवेकर (नगरसेवक) प्रभागात आपण मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे केली आहेत. जवळपास सिमेंट रस्ते झाले आहेत. काही कामांचे वर्क ऑर्डर व्हायचे असल्याने काही गल्ल्यांची कामे शिल्लक आहेत. तेथील रस्ते सुद्धा तातडीने पूर्ण करण्यावर भर आहे. यासोबतच समाजभवन व इतर अनेक कामे आपण केलेली आहे. प्रभागात सर्वात मोठी समस्या ही गडरची आहे. गडरलाईनवरच लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तिथे काम करणे कठीण जात आहे.