शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

प्रभाग -३ गरीबनवाजनगर-४

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही - शेख मेहबूब

नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही - शेख मेहबूब

वस्तीतून एक नाला गेला आहे. या नाल्याला पावसाळ्यात दरवर्षीच पूर येतो. घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होते. गेल्यावर्षी सुद्धा प्रचंड नुकसान झाले. सर्वे करण्यात आले. नुकसानग्रस्तांची नावे लिहून नेली. परंतु त्यांना नुकसान भरपाई मात्र अजूनही मिळालेली नाही. आम्ही जगायचे तरी कसे हा मुख्य प्रश्न आहे.
- एक दिवसाच्या आड पाणी येते- शफी कुन्नीसा
आमच्या वस्तीमध्ये पाण्याची फारशी टंचाई नाही. परंतु एक दिवसाच्या आड पाणी येते. दररोज पाणी आल्यास आणखी चांगले होईल. सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे कचऱ्याची आहे. कचरा उचलणारी गाडी वस्तीत फिरकतच नाही.

नळाची पाईपलाईन टाकली पण, पाणीच नाही - मो. अकबर
मीटरवरील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नुकतीच टाकली. स्वत:च्या खर्चाने ती पाईपलाईन टाकली, मात्र आता पाणी वर चढत नसल्याने संपूर्ण खर्च वाया गेला आहे. प्रशासनाला सांगितले तर हात वर करतात.
कित्येक वर्षांपासून नाल्याची सफाईच झाली नाही - हाफीज अब्दुल बासिद

संघर्षनगर येथून नाला हा कित्येक वर्षांपासून साफच झालेला नाही. त्यामुळे हा नाला जवळपास बुजलेला आहे. नाल्यातच कचरा साचला आहे. नाल्याची सफाई तातडीने न झाल्यास यंदाही पावसाळ्यात पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात दरवर्षी येथील घरांमध्ये नाल्याचे पाणी जाते. तेव्हा नाल्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गटारीचे पाणी घरात शिरते - जैबुन्निसा
नाल्याच्या शेजारी राहत असल्याने तसाही मोठा त्रास आहेच. परंतु गटारीचे पाणी घरात साचत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. घरात भरण भरले. मात्र दुर्गंधी जात नाही. नळाच्या पाण्याला सुद्धा दुर्गंध येतो.

दुर्गंधीमुळे जगणे कठीण - चांद बी मेहबूब
नाल्याचे आणि गटारीचे पाणी घरात पाझरत असल्याने संपूर्ण घरात दुर्गंध पसरतो. तशाच वातावरणात राहावे लागत आहे. घरामध्ये दरी किंवा पोते टाकून राहावे लागते. परंतु दुर्गंधी मात्र जात नाही. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे.