शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कॅनव्हासवर अवतरले कृष्णाचे दैवी स्वरूप

By admin | Updated: October 6, 2015 01:56 IST

कलेला कुठल्याही परिचयाची गरज नसते. ती स्वत: बोलते. सुप्रसिद्ध चित्रकार अर्चना श्रीवास्तव यांच्या दिल्लीच्या रवींद्र भवनात आयोजित चित्रप्रदर्शनात नेमके हेच बघायला मिळते.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकलेला कुठल्याही परिचयाची गरज नसते. ती स्वत: बोलते. सुप्रसिद्ध चित्रकार अर्चना श्रीवास्तव यांच्या दिल्लीच्या रवींद्र भवनात आयोजित चित्रप्रदर्शनात नेमके हेच बघायला मिळते. दैवी प्रतिभेच्या धनी असलेल्या अर्चनांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कृष्णाच्या दैवी लीला मनाला मोहून टाकतात.भगवान कृष्णाची विविध रूपे, त्याच्या लीलांवर आधारित या प्रदर्शनात अर्चना यांनी आपल्या कुंचल्यातून कान्हा, अचला, अच्युता, आदित्य, अनिरुद्ध, देवेश, गोपाल, गोविंद, कमलनयन, जनार्दन जगन्नाथ अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोपाळाची मनमोहक रूपे कॅनव्हासवर साकारलेली बघायला मिळतात. ‘डिव्हिनिटी’ या नावाने सजलेल्या या चित्रप्रदर्शनातील भगवान कृष्णाची विविध रूपे अक्षरश: खिळवून ठेवतात.अर्चना श्रीवास्तव यांची कला त्यांचे पती मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशिवाय कदाचित ‘राधेविना कृष्ण अधुरा’ तशीच ‘अधुरी’ असती. अर्चना आणि मनुकुमार एकमेकांना पूरक आहेत. मनुकुमार यांचा पाठिंबा आणि अर्चना यांचा करिश्मा नेमका हाच मिलाफ अर्चनांनी कॅनव्हासवर साकारलेल्या चित्रांमध्येही दिसतो. या चित्रप्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दशावतार तैलिय चित्रकथेत अर्चना यांनी ईश्वराची १० रूपे दर्शवली आहेत. राधा-कृष्ण शीर्षक असलेले चित्र स्वत: अर्चना यांच्या अतिशय आवडीचे आहे. ६९ इंच लांब आणि ५८ इंच रुंद कॅनव्हॉसवर ते साकारले आहे. प्रदर्शनातील प्रत्येक चित्र चित्रकार अर्चना यांच्या कल्पनाशक्तीसोबतच सर्जनशीलतेची साक्ष देणारे आहे. राधा यमुनेतिरी बसली आहे. यमुनेच्या शीतल, शांत, निळ्याशार पाण्यात तिचे प्रतिबिंब पडले आहे. पण राधेला त्या ठिकाणी स्वत:ची नाही, तर कृष्णाची मनोहारी छबी दिसते, हे चित्र डोळ्यांचे पारणे फेडते. राधा-कृष्णाच्या या प्रेमाची मनोहारी कल्पना करणे आणि नंतर ते कॅनव्हासवर साकारण्याचे कौशल्य अर्चना यांना तंतोतंत साधले आहे. अर्चनांच्या अन्य कलाकृतींमध्ये गोवर्धन लीला, कृष्णाचे विराट रूप, पाच इंद्रिये व आत्मा, हनुमान यांसारख्या पेंटिंगना चित्रप्रेमींकडून विशेष दाद मिळत आहे.