लातूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने २०१४-१५ या वर्षीच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत़ यात गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांचा समावेश आहे़ पुरस्कारर्थींना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख १० हजार रूपये देण्यात येणार आहेत़ यासह गुणवंत क्रीडापटूंसाठी महिला व पुरुष गटात स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहेत़ पुरस्काराचे वर्ष १ जुलै ते ३० जून असे राहिल़ यासाठीचे अर्ज १५ ते १९ डिसेंबरदरम्यान, क्रीडा कार्यालयात उपलब्ध राहणार असून, २६ डिसेंबरपर्यंत हे अर्ज कार्यालयात दाखल करावेत, असे क्रीडाधिकारी सोमदत्त देशपांडे यांनी कळविले आहे़
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज
By admin | Updated: December 14, 2014 00:09 IST