शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शंकरनगर, सांगोला संघाची नेत्रदीपक कामगिरी जिल्हा शालेय बास्केटबॉल स्पर्धा

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

अकलूज :

अकलूज :
सोलापूर जिल्हा शालेय बास्केटबॉल स्पर्धेत महर्षी प्रशाला शंकरनगर व विद्या मंदिर सांगोला या संघांनी नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले.
सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी जुबेर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव शिवदास शिंदे, प्राचार्य झेड. एस. दोहोदवाला, प्रताप क्रीडा मंडळाचे अनिल जाधव, महेश ढेंबरे व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
या स्पर्धेत अकलूज, सांगोला, पंढरपूर व बार्शी येथील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धा 14, 17 व 19 वर्षे वयाच्या मुले व मुलींच्या गटात घेण्यात आल्या. 14 वर्षीय गट मुलांमध्ये महर्षी प्रशाला, शंकरनगरने सांगोला विद्यामंदिरचा 32 विरूध्द 24 असा 8 गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात जिजामाता कन्या प्रशाला, अकलूजने शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूलचा 11 विरूध्द 8 असा 3 गुणांनी पराभव केला. 17 वर्षीय मुलांच्या गटात सांगोला विद्यामंदिर, सांगोला संघाने शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूलचा 22 विरूध्द 5 असा 17 गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात महर्षी शंकरराव मोहिते-प्रशालेने सांगोला विद्यामंदिर, सांगोलाचा 6 विरूध्द 2 असा 4 गुणांनी पराभव केला. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात सदाशिवराव माने विद्यालय, अकलूजने महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेचा 21 विरूध्द 14 असा 7 गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात सांगोला विद्यामंदिर, सांगोला हा एकच संघ असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख चंद्रकांत कांबळे, अनिल जाधव, महेश ढेंबरे, विशाल ढेंबरे, लखन मोरे, प्रदीप पांढरे, शशांक गायकवाड यांनी पंचाचे काम केले. (वार्ताहर)