शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पानासाठी.... एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीर निवडणूक लावली *ए. डी. चौगले यांची पोलिसांत तक्रार : भोगावती शिक्षण मंडळाचे राजकारण

By admin | Updated: May 12, 2014 21:35 IST

कोल्हापूर : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीररीत्या संस्थेची निवडणूक लावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अगर सभा बोलावण्याचा कोणताही अधिकार नसताना निव्वळ कारखान्याच्या संचालकांना मदत करण्यासाठी संगनमताने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ए. डी. चौगले यांनी करवीर पोलिसांकडे आज (सोमवार) केली.

कोल्हापूर : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीररीत्या संस्थेची निवडणूक लावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अगर सभा बोलावण्याचा कोणताही अधिकार नसताना निव्वळ कारखान्याच्या संचालकांना मदत करण्यासाठी संगनमताने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ए. डी. चौगले यांनी करवीर पोलिसांकडे आज (सोमवार) केली.
भोगावती शिक्षण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन हे शिक्षण मंडळाचे पदसिद्ध सदस्य, तर कार्यकारी संचालक हे प्रधान सचिव असतात. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाने एकत्रित येत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर कॉँग्रेसने ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याचे सांगत अलिप्त राहणे पसंत केले आहे. १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, आज ए. डी. चौगले यांनी संस्थेचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांच्याविरोधात करवीर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
संस्थेची २३ मार्च २०१४ ला विशेष सर्वसाधारण सभा होऊन त्यामध्ये २०१४ ते २०१९ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड होऊन या कार्यकारी मंडळ निवडीबाबतचा मुंबई विश्वस्थ कायद्याप्रमाणे उपधर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात द्यावा लागणारा बदल अर्जही संस्थेने दाखल केला आहे. निवडण्यात आलेले कार्यकारी मंडळ हे संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहत आहेत, पण कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा शिक्षण मंडळाचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम लावला आहे. ही फसवणूक असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चौगले यांनी पोलिसांत केली आहे.
कोट-
शिक्षण मंडळाची मुदत संपल्यानंतर २७ एप्रिलला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेनेच हा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम बेकायदेशीर होता, तर ए. डी. चौगले यांनी न्यायालयातून स्थगिती का आणली नाही? सभासदांना अंधारात ठेवून संस्था हडप करण्याचा डाव चौगले यांचा होता. संस्थेचा प्रधान सचिव म्हणून न्यायालयाने आपणाला निवडणूक घेण्याचा अधिकार दिला, हे चौगले यांनी माहिती करून घ्यावे म्हणजे फसवणूक कोण करते, हे त्यांना समजेल.
- एस. एस. पाटील (प्रधान सचिव, शिक्षण मंडळ)