मालमत्तेचे विदू्रपीकरण केल्यास तीन महिने शिक्षा जिल्हाधिकारी : विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभरात आचारसंहिता
By admin | Updated: October 21, 2016 00:17 IST
जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.
मालमत्तेचे विदू्रपीकरण केल्यास तीन महिने शिक्षा जिल्हाधिकारी : विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभरात आचारसंहिता
जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता सुरु झाली आहे. या काळात विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जे राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी तत्काळ काढून टाकावे. अन्यथा या कायद्यानुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन हजारांचा दंड करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकार्यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिला आहे. या काळात निवडणूक पत्रकाच्या अथवा भिंत्ती पत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रकाचे नाव व पत्ता तसेच प्रकाशकाचे नाव व पत्ता तसेच एकुण छापलेली संख्या टाकावी अशी सूचना मुद्रकांना केली आहे.