बँक खात्याची माहिती नसल्याने मदत वाटपात अडचणी नागपूर जिल्हा : १३ कोटींचे वाटप
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नागपूर: जिल्ातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती महसूल प्रशासनाकडे नसल्याने व शेतकऱ्यांनीही त्यांच्या बँक खात्याची माहिती न कळविल्याने शासनाकडून जाहीर झालेली मदत येत्या २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. नागपूर जिल्ात आतापर्यंत ११० कोटी रुपयांपैकी फक्त १३ कोटींचे वाटप झाले आहे.
बँक खात्याची माहिती नसल्याने मदत वाटपात अडचणी नागपूर जिल्हा : १३ कोटींचे वाटप
नागपूर: जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती महसूल प्रशासनाकडे नसल्याने व शेतकऱ्यांनीही त्यांच्या बँक खात्याची माहिती न कळविल्याने शासनाकडून जाहीर झालेली मदत येत्या २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ११० कोटी रुपयांपैकी फक्त १३ कोटींचे वाटप झाले आहे.दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने पहिल्या टप्प्यात ४० टक्के म्हणजे दोन हजार कोटींची मदत जाहीर केली असून यापैकी ११० कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. ही मदत जिल्ह्यातील १७९५ गावातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २६ जानेवारीपर्यंत जमा करायची आहे. यासाठी केवळ तीनच दिवस शिल्लक आहे. जिल्हा प्रशासनाने मदत वाटपाचा आढावा घेतला असता आतापर्यंत १३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास काही अंशी त्यांच्या बँक खात्याची माहिती नसणे ही बाब कारणीभूत ठरत आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार ठप्प असल्याने त्यात सरकारी मदत जमा करू नये, अशा सूचना आहेत.परंतु वेळोवेळी सांगूनही अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते इतर बँकेत उघडले नाहीत. काही शेतकऱ्यांनी जन-धन योजनेत खाते उघडली पण खाते क्रमांक प्रशासनाला कळविले नाही.त्यामुळे रक्कम जमा करताना अडचणी येत आहेत. तसेच शहरा लगत असलेल्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकल्याने आणि जमिनीच्या नवीन मालकासोबत संपर्क होत नसल्याने रक्कम कोणाच्या खात्यात जमा करावी असा पेच प्रशासनापुढे आहे. गत वर्षीही मदत वाटप करताना हीच अडचण आली होती व त्यामुळे काही रक्कम वाटपाविनाच शिल्लक राहिली होती हे येथे उल्लेखनीय.महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या याद्या व त्यांचे खाते क्रमांक गोळा करण्यात सध्या व्यस्त आहे. याद्या तयार झाल्यावर संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा होईल. त्यासाठी आणखी काही अवधी लागण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या हाती तत्काळ मदत पोहोचवण्याच्या घोषणेला यामुळे तडा जाणार आहे. (प्रतिनिधी)