शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर महाविद्यालयात आविष्कार संशोधन व्याख्यानमाला संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 17:57 IST

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन २०१५ हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर (ता. जुन्नर) येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळ (बीसीयूडी) यांच्या सहकार्याने ओतूर महाविद्यालयाने एकदिवसीय (आविष्कार) संशोधन मार्गदर्शन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.

ओतूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन २०१५ हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर (ता. जुन्नर) येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळ (बीसीयूडी) यांच्या सहकार्याने ओतूर महाविद्यालयाने एकदिवसीय (आविष्कार) संशोधन मार्गदर्शन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे विशेषाधिकारी डॉ. रवींद्र जॉयभाय व सुप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ डॉ. राम गंभीर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराज कुकाळे होते. व्याख्यानमालेसाठी नवनियुक्त उपप्राचार्य एस. एफ. ढाकणे, प्रा. डॉ. जी. एन. डुंबरे, महाविद्यालयाचे शैक्षणिक व संशोधक समन्वयक डॉ. एस. आर. रहांगडाले, प्रा. एम. बी. राठोड, जुन्नर तालुक्यातील सर्व महाविद्यालयांतील १०२ विद्यार्थी, ४० प्राध्यापक, महाविद्यालयाचे इच्छुक ४० संशोधक विद्यार्थी, विज्ञान शाखेचे प्राध्यापक उपस्थित होते. जॉयभाय म्हणाले, की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजातील व सभोवतालचे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, शेतीविषयक, ऊर्जाविषयक, शास्त्रीय इ. मूलभूत प्रश्न किंवा सर्वसामान्यांच्या दैनिक गरजा, समस्यांचे वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना शोधावी. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या वतीने दरवर्षी आविष्कार संशोधन प्रकल्प सादरीकरणासाठी स्पर्धा घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व कल्पनांना व्यक्त करून त्याचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. संशोधनासाठी काही पायर्‍या आहेत. त्यात पहिली पायरी पूर्वतयारी. दुसरी पायरी प्रकल्पाची संशोधन पद्धती. संशोधन पद्धतीनंतर संशोधनाचा कच्चा-पक्का आराखडा. आराखड्यानुसार कार्य केल्यावर येणारी निरीक्षणे करून निष्कर्ष काढावेत. विश्लेषण पद्धतीनं साखळी पद्धतीचा वापर करून सिद्धांत मांडावे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. राम गंभीर यांनी गुंफले. त्यांनी मानवशास्त्र, सामाजिक शास्त्रातील संशोधन कार्य, त्यांची संशोधन पद्धती तसेच या संशोधनाचे सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, राजकीय दृष्टिकोनातून स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे सकारात्मक व नकारात्मक परिणाम विशद केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दोन्ही व्याख्यात्यांनी सविस्तर उत्तरे दिली. व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य शिवराज कुकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ओतूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबविले, त्याची सविस्तर माहिती देऊन व्याख्यात्यांना धन्यवाद दिले. या व्याख्यानमालेचे आयोजक महाविद्यालयाचे शैक्षणिक व संशोधक समन्वय डॉ. एस. आर. रहांगडाले यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. (जोड आहे.......)