नाशिकमध्ये मिरवणुकीवरुन धुमश्चक्री !
By admin | Updated: September 6, 2015 23:09 IST
(फोटोडेस्क)
नाशिकमध्ये मिरवणुकीवरुन धुमश्चक्री !
(फोटोडेस्क)वाहनाची तोडफोड : जंगलीदास महाराजांच्या भाविकांवर साधूंचा हल्लाबोलनाशिक : आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग करुन शाहीमार्गावरुन मिरवणूक काढणार्या जंगलीदास महाराजप्रणीत आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर शनिवारी साधुग्राममधील साधू-महंतांनी हल्लाबोल केला. संतप्त साधूंनी मिरवणुकीतील वाहनाची तोडफोड करीत भाविकांवर लाठ्या, शस्त्रे उगारल्याने एकच गोंधळ उडाला.पोलिसांनी मध्यस्थी करीत आत्मा मालिक ध्यानपीठाची मिरवणूक अन्य मार्गाने वळवल्याने अनर्थ टळला. कुंभमेळ्यात यंदा प्रथमच कोकमठाण येथील विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टने आत्मा मालिक ध्यानपीठ उभारले आहे. पोलिसांच्या परवानगीनंतर त्यांनी शनिवारी दुपारी साधुग्राममधून शाहीमार्गानेच गोदाघाटावर मिरवणूक निघाली. मिरवणूक पंचवटी भागात येताच अनेक साधू लाठ्या-काठ्या, तलवारी, कुर्हाडी, भाले आदि शस्त्रास्त्रे घेऊन ध्यानपीठाच्या भाविकांवर चालून आले. काही भाविकांना धक्काबुक्की करीत त्यांनी मिरवणुकीतील एका वाहनाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत दोन्ही गटांची समजूत काढली. शाहीमार्गावरुन मिरवणूक काढण्याचा अधिकार व मान केवळ आखाडा परिषदेच्या साधू-महंतांनाच असून २० ऑगस्ट ते १८ सप्टेंबर दरम्यान कोणालाही मिरवणुकीची परवानगी देऊ नये, असे पत्र आखाड्यांनी आधीच पोलिसांना दिले होते. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारचा प्रसंग ओढावला. पळापळीने गोंधळसंतप्त साधू-महंत मिरवणुकीवर चालून आल्याने भाविकांची एकच पळापळ झाली. नेमके काय झाले, हे कुणालाच कळेना. मिरवणुकीत लहान मुले, महिलांचाही समावेश होता. अचानक गोंधळ उडाल्याने अनेकांनी भीतीने जवळच्या खालशांमध्ये आश्रय घेतला. (प्रतिनिधी)-----------साधुग्राममधील मुख्य मार्गावरून आखाड्यांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येत नाही. तसे पत्र पोलिसांना दिले आहे. त्यानंतरही मिरवणूक काढल्याने विरोध केला.- श्री महंत धरमदास, निर्वाणी आखाडा------------------मिरवणुकीला परवानगी देताना पोलिसांनी तिन्ही अनी आखाड्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. आत्मा मालिक ध्यानपीठाने आखाड्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. - श्री महंत कृष्णदास, दिगंबर आखाडा------------कोणाची तक्रार आल्यास तोडफोड करणार्यांवर गुन्हे दाखल केले जातील. तथापि, दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद टाळावा.- अविनाश बारगळ, पोलीस उपआयुक्त-------------------शांततामय मार्गाने चालणारा आमचा पंथ असून, साधुग्राममध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल मला काही बोलावयाचे नाही. मिरवणुकीतील हजारोंचा जनसमुदाय पाहून बहुधा काहींना ईर्षा निर्माण झाल्याने हा प्रकार घडला असावा.- हनुमंत भोंगळे, आत्मा मालिक ध्यानपीठ