केबल टाकताना जलवाहिनी फुटली पाण्याची नासाडी : कंपनीच्या खर्चाने आज दुरूस्ती
By admin | Updated: February 23, 2016 00:02 IST
जळगाव : बळीरामपेठेत खाजगी कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला जात असताना १५ इंची जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. कंपनीच्या खर्चानेच या जलवाहिनीची मंगळवारी दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.
केबल टाकताना जलवाहिनी फुटली पाण्याची नासाडी : कंपनीच्या खर्चाने आज दुरूस्ती
जळगाव : बळीरामपेठेत खाजगी कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला जात असताना १५ इंची जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. कंपनीच्या खर्चानेच या जलवाहिनीची मंगळवारी दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.शहरात खाजगी कंपनीच्या फोर-जी इंटरनेट सेवेसाठी केबल टाकण्याचे काम सुरू असून त्यामुळे रस्त्यांचे तीनतेरा होत आहेत. सोमवारी बळीरामपेठ भागात भाजपा कार्यालयासमोर केबल टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम सुरू असताना १५ इंची जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. ----- इन्फो-----दूषित पाण्याचा शोध सुरूचबळीरामपेठेतील काही भागात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या कारणाचा शोध पाणीपुरवठा विभागाकडून सुरूच आहे. कुठेतरी जलवाहिनीला असलेल्या गळतीमुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा अंदाज आहे.