शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’च्या २० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: June 25, 2017 01:00 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या २० आमदारांची मंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून केलेली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या २० आमदारांची मंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून केलेली नियुक्ती, दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली असली, तरी त्यांना अपात्र घोषित करण्याविषयीचे प्रकरण यापुढेही सुरूच राहील, असा निकाल निवडणूक आयोगाने दिल्याने, या आमदारांच्या डोक्यावरील संभाव्य अपात्रतेची टांगती तलवार कायम राहिली आहे.‘आप’च्या एकूण २१ आमदारांना १५ मार्च २०१५ रोजी मंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून नेमले गेले. हे पद ‘लाभाचे पद’ असल्याने या आमदारांना राज्यघटनेनुसार अपात्र घोषित केले जावा, अशी याचिका प्रशांत पटेल यांनी राष्ट्रपतींकडे केली. राष्ट्रपतींनी हे प्रकरण निर्णयासाठी निवडणूक आयोगाकडे पाठविले. ते आयोगात प्रलंबित असताना, दिल्ली उच्च न्यायालयाने ८ सप्टेंबर २०१६ रोजी या नियुक्त्या रद्द केल्या.ज्या पदांवरून ही अपात्रतेसाठी याचिका केली गेली, ती पदेच आता रद्द झाल्याने, ही याचिकाही निरर्थक ठरली आहे. त्यामुळे ती निकाली काढावी, असा अर्ज या आमदारांनी आयोगाकडे केला. मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी व निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती तो फेटाळला व या आमदारांविरुद्ध अपात्रसेसंबंधीची सुनावणी यापुढेही सुरू राहील, असा निकाल दिला...तर ‘मिनी’ निवडणूकदिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा आम आदमी पार्टीने (आप) जिंकल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यापैकी स्वत:सह २१ जणांचे मंत्रिमंडळ स्थापन केल़े़ आयोगाने या आमदारांना अंतिमत: अपात्र घोषित केले, तर दिल्लीमध्ये ‘आप’चे मोठे बहुमत असूनही ७० पैकी २० विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवू शकेल.