शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढा

By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST

जळगाव : किरकोळ कारणांवरून उद्भवणारे वाद, तंटे विकोपाला जाऊन सार्वजनिक शांततेला गालबोट लागते. त्यामुळे होणार्‍या गंभीर स्वरुपाच्या परिणामांचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून असे वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात दुर्दैवाने असा प्रकार घडलाच; तर त्याला खतपाणी घालणार्‍यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जळगाव : किरकोळ कारणांवरून उद्भवणारे वाद, तंटे विकोपाला जाऊन सार्वजनिक शांततेला गालबोट लागते. त्यामुळे होणार्‍या गंभीर स्वरुपाच्या परिणामांचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून असे वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात दुर्दैवाने असा प्रकार घडलाच; तर त्याला खतपाणी घालणार्‍यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.
शनिपेठ भागात रविवारी रात्री घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी केले. या बैठकीला शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, माजी उपमहापौर करीम सालार, बि˜ू सालार, आत्माराम ढंढोरे, आरिफ देशमुख, अब्दूल मिर्झा, मोहन तिवारी, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, चेतन संकेत, मुकुंद सपकाळे, याकूब खान मुश्ताक खान, गोयल, शेख हारून शेख नूर, कयूम शेख, मिर्झा अब्दूल यांच्यासह शनिपेठ परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
रविवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिपेठ भागात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही गटातील सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हा वाद त्वरित निकाली काढावा; तो पुढे वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. भविष्यातही परिसरात शांतता टिकून राहिल, यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक शांततेला कुणी मुद्दाम गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. त्याचप्रमाणे हा वाद पुढे वाढणार नाही, अशी ग्वाही बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी दिली.
दुसर्‍या दिवशी तणावपूर्ण शांतता
रविवारी घडलेल्या प्रकारानंतर सोमवारी शनिपेठ भागात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. दुपारी १२ वाजेनंतर हळहळू येथील परिस्थिती पूर्वपदावर आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने शनिपेठ भागात ठिकठिकाणच्या पॉइन्टवर बंदोबस्त कायम ठेवला होता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिसांकडून दिवसभर पेट्रोलिंग सुरू होती.
कोट
दंगलीतील १२ आरोपींना अटक असून उर्वरित फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्तही कायम आहे. शांतता टिकून रहावी, यासाठी शांतता समितीची बैठक घेतली. फरार आरोपींनादेखील अटक होईल.
-आत्माराम प्रधान, पोलीस निरीक्षक, शनिपेठ, पोलीस ठाणे.