शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश निवडीच्या नव्या पद्धतीस आव्हान देणा-या याचिका खारीज

By admin | Updated: August 25, 2014 23:58 IST

न्या. अनिल आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नवी पद्धत प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात येण्याआधीच त्याविरुद्ध केल्या गेलेल्या या याचिका अकाली असल्याचे कारण देत फेटाळल्या

नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची प्रचलित पद्धत मोडीत काढून त्याऐवजी सात सदस्यांच्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाकडून या नेमणुका करण्याची नवी पद्धत अवलंबिण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या पद्धतीस आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीसाठी दाखल करून न घेताच फेटाळल्या.न्या. अनिल आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नवी पद्धत प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात येण्याआधीच त्याविरुद्ध केल्या गेलेल्या या याचिका अकाली असल्याचे कारण देत फेटाळल्या. मात्र याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आलेले घटनात्मक मुद्दे न्यायालयाने खुले ठेवले असून योग्य वेळी याचिकाकर्ते त्याआधारे नव्याने याचिका करू शकतील, अशी मुभा खंडपीठने दिली. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने वरील निर्णय दिला. अ‍ॅटर्नी जनरलचे असे म्हणणे होते की, या याचिका ज्याबद्दल करण्यात आल्या आहेत ते घटनादुरुस्ती विधेयक व राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक अद्यापही संसदेच्या कार्यकक्षेतच आहेत. या विधेयकांचे प्रत्यक्ष कायद्यात रूपांतर होण्यासाठी राज्यघटनेनुसार अजूनही काही टप्पे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या टप्प्याला न्यायालयाने या याचिकांवर विचार करणे म्हणजे सुरु असलेल्या वैधानिक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखे होईल. मात्र एका याचिकाकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील फली नरिमन यांनी असा आग्रह धरला की, या टप्प्याला अशा याचिका केल्या जाऊ शकतात की नाही हाच विषय निर्णयासाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवावा.(लोकमत न्यूज नेटवर्क)