निष्क्रिय अधिकार्यांची वेतनवाढ रोखणार विभागीय आयुक्तांंनी काढली खरडपी : ग्रा.पं., स्वच्छता, शिक्षण विभागाबाबत व्यक्त केली नाराजी
By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST
जळगाव- इंदिरा आवास, शाळा गुणवत्ता विकास, बंधारे बांधणी व इतर विकास कामांमध्ये दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत निम्मी कामेही न करणार्या तालुका स्तरावरील वरिष्ठ, जबाबदार अधिकार्यांची वेतनवाढ रोखा... वेळ आली तर कडक कारवाई करा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी गुरुवारी जि.प.त आयोजित आढावा बैठकीत दिल्या.
निष्क्रिय अधिकार्यांची वेतनवाढ रोखणार विभागीय आयुक्तांंनी काढली खरडपी : ग्रा.पं., स्वच्छता, शिक्षण विभागाबाबत व्यक्त केली नाराजी
जळगाव- इंदिरा आवास, शाळा गुणवत्ता विकास, बंधारे बांधणी व इतर विकास कामांमध्ये दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत निम्मी कामेही न करणार्या तालुका स्तरावरील वरिष्ठ, जबाबदार अधिकार्यांची वेतनवाढ रोखा... वेळ आली तर कडक कारवाई करा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी गुरुवारी जि.प.त आयोजित आढावा बैठकीत दिल्या. जि.प.तील शाहू महाराज सभागृहात दुपारी ही बैठक झाली. व्यासपीठावर आयुक्त डवलेंसह सीईओ आस्तिककुमार पांडेय, उपायुक्त (विकास) नृसिंह मित्रगोत्रे, उपायुक्त (आस्थापना) एस.के.बनकर, सहायक आयुक्त (चौकशी) तुषार माळी, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी होते. क श्रेणीत ८८४ शाळा, पेपरमधून प्रसिद्धीच्या मागे लागू नकाजि.प.च्या कमाल शाळा क श्रेणीत आहेत. ही संख्या सध्या ८८४ एवढी आहे. ही बाब चिंतानजक आहे. आपण शाळा आयएसओ करतो, डीजीटल करतो व पेपरमधून प्रसिद्धी मिळवितो. हे योग्य नाही. आयएसओ, डीजीटल शाळांचा कार्यक्रम हाती घेतानाच क श्रेणीमधील शाळा अ श्रेणीत कशा येतील यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. बोदवड, भडगाव येथील क श्रेणीत सर्वाधिक शाळा आहेत. याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. क श्रेणीतील शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याक श्रेणीतील शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करा... कारवाई हाती घ्या... उद्या बदल्या सुरू झाल्या की शाळा ब श्रेणीत आणण्याचा चमत्कार शिक्षक करतील. शिक्षण विभाग कागदोपत्री काहीही करू शकतो. तसेच यामुद्द्यावर संबंधित विभागप्रमुख कारवाई करीत नसतील तर सीईओ कारवाई करतील, असेही डवले म्हणाले. चाळीसगाव सहायक अधिकार्यांची तक्रार आणि लिपीकाचे कामघरकूल योजनेसह इतर कामांमध्ये चाळीसगाव तालुका मागे असल्याने डवले यांनी गटविकास अधिकार्यांची खरडपी काढली. यात गटविकास अधिकारी यांनी आपल्याला सहायक गटविकास अधिकारी सहकार्य करीत नाही... ते आजही बैठकीला आले नाही..., अशी तक्रार केली. यावर सहायक गटविकास अधिकारी यांचे अधिकार काढून त्यांना लिपिकाचे काम द्या, अशा सूचना डवले यांनी दिल्या. निम्मी घरकुलेही कशी तयार झाली नाहीत?जिल्ह्यात घरकुलांचा सात हजार लक्ष्यांक दिला होता. पण फक्त ३५०० घरकुले पूर्ण झाली. नाशिक, धुळ्यापेक्षाही जिल्हा मागे आहे. अधिकार्यांना गांभीर्य नाही... ते दुर्लक्ष करतात, असेही डवले म्हणाले.