शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची शहा, जेटली यांच्याशी चर्चा

By admin | Updated: May 21, 2016 04:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या सल्लामसलत केली

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल आणि भाजपच्या धोरणात्मक मंडळांची फेररचना करण्यात येणार असल्याची कुजबूज होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या सल्लामसलत केली. त्यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि , माहितगार सूत्रांनुसार मंत्रिमंडळ आणि पक्षांतर्गत फेरबदलासंदर्भात चर्चा झाली असावी. मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.तथापि, भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ नेते चर्चा करीत असतात. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने केंद्रात या राज्याला अधिक प्रतिनिधीत्व दिले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.अमित शहा यांनी काल, गुरुवारी मात्र या फेरबदलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला बगल देत यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले. भाजप अध्यक्ष म्हणून अमित शहा यांच्या हाती दुसऱ्यांदा धुरा देण्यात आल्याने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही बदल केले जाण्याची शक्यता आहे.११ आणि १२ जून रोजी भाजप राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक होणार असून त्याआधीच पक्ष संघटनात्मक फेरबदल व कार्यकारीणी सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. सरकार आणि पक्ष संघटनेत एकाचवेळी बदल करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. काही मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी टाकली जाईल. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी हा फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.>पंतप्रधान ७ जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावरनवी दिल्ली /वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जून रोजी अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते व्हाइट हाउसमध्ये अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतील आणि उभय देशांतील सुरक्षा, ऊर्जा तसेच अन्य क्षेत्रांत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतील. शिवाय ते अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीलाही संबोधित करतील.