शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

५०० एकर जागेसाठी आमदारांचा प्रयत्न पाण्यासाठी चर्चा : नशिराबाद शिवारात नवीन सबस्टेशनचे काम सुरू ( भाग आठ)

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

जळगाव : औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी तालुक्यात सुमारे ५०० एकर जागेचा शोध सुरू आहे. उमाळा व नशिराबाद भागात इतर उद्योग असल्याने याच क्षेत्रातील जमीन अधिग्रहित करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न सुरू केले आहे.

जळगाव : औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी तालुक्यात सुमारे ५०० एकर जागेचा शोध सुरू आहे. उमाळा व नशिराबाद भागात इतर उद्योग असल्याने याच क्षेत्रातील जमीन अधिग्रहित करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न सुरू केले आहे.
एमआयडीसीच्या विस्तारासाठी जळगाव तालुक्यातील नशिराबाद, कडगाव, उमाळा यापैकी एक गाव दत्तक घेऊन एमआयडीसीचा विकास करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी उमाळा व नशिराबाद परिसरात नुकतेच नवीन सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहे. या भागात पाण्याची समस्या मोठी आहे. त्यासाठी हतनूर व वाघूर धरणातून व्यावसायिकपद्धतीने नियमानुसार पाण्याचेे वाटप करण्यासाठी त्यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
प्लॉट परत घेऊन नवीन उद्योजकांना देणार
शहरातील एमआयडीसी भागात अनेक उद्योगांसाठी प्लॉटचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांश प्लॉटवर उद्योगांची उभारणी झालेली नाही तर अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. अशा प्लॉट धारक व बंद उद्योगांना विनंती करून उद्योग भाडे अथवा भागीदारी तत्त्वावर सुरू करण्याची गरज आहे. अनेक वर्षांपासून प्लॉट घेऊन उद्योगांची उभारणी न करणार्‍या प्लॉट धारकांकडून प्लॉट परत घेऊन नवीन उद्योजकांना देण्याची गरज आहे. याबाबत संबंधितांना एमआयडीसीकडून नोटीस देण्याची गरज आहे.

३५ उद्योजकांशी चर्चा
शहरासह परिसरात नवीन उद्योग येण्यासाठी टायर, केमिकल सह अन्य जवळपास ३५ उद्योजकांशी चर्चा करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इंदौर या शहरांसह गुजरात राज्य जवळ आहे व वाहतुकीसाठी रेल्वे, महामार्गाची चांगली सुविधा असल्याचे व्हिजन उद्योजकांसमोर ठेवण्यात आले आहे. उद्योगांना परिसरातील नशिराबाद, उमाळा, कडगाव कंडारी सह इतर गावामधून मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे परिसरातील युवकांना रोजगार मिळणे शक्य होईल.

कोट

जळगाव एमआयडीसी भागात जागा शिल्लक नसल्याने उजाळ कुसुंबा व नशिराबाद शिवारातील जमिनीच्या प्रस्तावासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. एमआयडीसीमध्ये अनेक मोकळे प्लॉट आहेत. त्या ठिकाणी कोणतेही उद्योग नाहीत. अशा प्लॉटधारकांना ते सोडण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे. लघुउद्योगांना प्राधान्य मिळावे ही आपली भूमिका आहे. या भागातील मोकळ्या जागा उद्योजक आणि एमआयडीसी विभाग यांनी विकसित करून त्याचा कार्यक्रमांसाठी वापर करावा.
सुरेश भोळे, आमदार, जळगाव ग्रामीण.