शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची विरोधकांशी चर्चा

By admin | Updated: June 16, 2017 03:47 IST

भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू केली असून, नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

- हरिष गुप्ता। लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू केली असून, नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणी केली. त्यांनी आज तेलुगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशीही चर्चा केली.वेंकय्या नायडू यांनी काल प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधून, आपणास शरद पवार यांना भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. पण पवार दिल्लीत नव्हते. त्यामुळे आज ते पवार यांच्याशी फोनवर बोलले. आपण दिल्लीत आल्यावर प्रत्यक्ष बोलू, असे पवार यांनी नायडू यांना सांगितले आहे. वेंकय्या नायडू यांनी चंद्राबाबू यांनाही चर्चेसाठी दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.अर्थात राष्ट्रपतीपदासाठी कोणत्याही विशिष्ट नेत्याचे नाव या चर्चेत न घेण्याचे भाजपाने ठरवले आहे. विरोधी नेत्यांकडून आधी त्यांच्या सूचना ऐकून घ्या, असे पंतप्रधानांनी आपल्या नेत्यांना सांगितले आहे.आपल्या हातातील पत्ते लगेच उघड न करण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांची बैठक पुढील सोमवार वा मंगळवारी राजधानीत होईल. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भाजपा नेते पुन्हा विरोधकांना भेटतील आणि भाजपा २३ जूनपर्यंत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करेल, असे दिसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट अमित शाह रविवारी घेणार आहेत. शाह शुक्रवारी मुंबईत पोहोचत आहेत.पहिली फेरी रविवारपर्यंत पूर्ण करणारनायडू आणि गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांना भेटणार आहेत. अरुण जेटली शुक्रवारी रात्री परदेशातून परत आल्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चेची पहिली फेरी भाजपा रविवारपर्यंत पूर्ण करणार आहे.