शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पेन्ह द फ्रांस ग्रामसभेत बेकायदा बांधकामांबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2015 23:31 IST

पर्वरी : पेन्ह द फ्रांस पंचायतीची ग्रामसभा शांततेत झाली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन उपसरपंच स्वप्नील चोडणकर यांनी केले. ग्रामसभेत काही बेकायदा बांधकामांबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत चोडणकर यांनी अल्पावधीतच कारवाई केली जाईल, असे सांगितले. पंचायतीला पूर्णवेळ सचिव आणि तलाठी हवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सध्या विधानसभा अधिवेशनात आमदार रोहन खंवटे यांनी मांडलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पर्वरीचा समावेश करावा, याला पाठिंबा देताना माजी सरपंच भिकू सावंत यांनी पंचायतीने यामागील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी केली. पणजीतील सर्व सरकारी कार्यालये पर्वरीत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पंचायत क्षेत्रात वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांवर त्याचा अतिरिक्त ताण येत आहे. पणजी शेजारील ताळगाव पंचायत क्षेत्रातील भागाचा ‘स्मार्ट सिटी’ य

पर्वरी : पेन्ह द फ्रांस पंचायतीची ग्रामसभा शांततेत झाली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन उपसरपंच स्वप्नील चोडणकर यांनी केले. ग्रामसभेत काही बेकायदा बांधकामांबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत चोडणकर यांनी अल्पावधीतच कारवाई केली जाईल, असे सांगितले. पंचायतीला पूर्णवेळ सचिव आणि तलाठी हवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सध्या विधानसभा अधिवेशनात आमदार रोहन खंवटे यांनी मांडलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पर्वरीचा समावेश करावा, याला पाठिंबा देताना माजी सरपंच भिकू सावंत यांनी पंचायतीने यामागील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी केली. पणजीतील सर्व सरकारी कार्यालये पर्वरीत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पंचायत क्षेत्रात वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांवर त्याचा अतिरिक्त ताण येत आहे. पणजी शेजारील ताळगाव पंचायत क्षेत्रातील भागाचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट करण्याचा विचार केला जातो. मग पर्वरीचा का विचार केला जात नाही, असा सवाल त्यांनी केला. याच पर्वरीत सचिवालय संकुल, मोठमोठी सरकारी कार्यालये आहेत. काळानुरूप पर्वरीचे शहरीकरण होत आहे. त्यामुळे पर्वरीचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश होणे आवश्यक आहे. नपेक्षा पर्वरीत यापुढे सरकारी कार्यालयांना ना हरकत दाखला देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी मालीम जेटीनजिकचा कचरा, नादुरु स्त बोटी स्थलांतरित करणे, रस्ते, बाग व्यवस्थापन आणि गटारांची अवस्था याबाबत चर्चा झाली.
सचिव लेन्सी ज्युलिओ यांनी इतिवृत्त वाचून त्यास मंजूरी मिळवली. गट विकास अधिकारी केशव राव यांनी ग्रामसभेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी उपसरपंच स्वप्नील चोडणकर, राधिका सावंत, ब्लांच डिसोझा, गजानन हळर्णकर, दीपाली वेर्णेकर, सफर फडते, घनश्याम नाईक, सुभाष कळंगुटकर आणि जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
ग्रामस्थांना उत्तर देताना उपसरपंच स्वप्नील चोडणकर आणि इतर. (शेखर वायंगणकर)