शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

नेहरू म्युझियममध्ये फेरबदलापूर्वी चर्चा करा

By admin | Updated: September 6, 2015 04:01 IST

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने गांधी स्मृती, ललित कला अकादमी, तसेच नेहरू स्मारक म्युझियम आणि वाचनालयासारख्या ३९ संस्थांमध्ये व्यापक फेरबदलाची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने गांधी स्मृती, ललित कला अकादमी, तसेच नेहरू स्मारक म्युझियम आणि वाचनालयासारख्या ३९ संस्थांमध्ये व्यापक फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली असताना देशातील बुद्धिजीवींनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारमधील काही लोकांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे नेहरू स्मारक म्युझियम आणि वाचनालयाची भूमिका आणि प्रतिष्ठा धोक्यात आली असून, या संस्थेत कुठलाही फेरबदल करण्यापूर्वी यावर जाहीर चर्चा घडविण्यात यावी, अशी मागणी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्यासह चार प्रमुख बुद्धिजीवींनी शनिवारी केली. यामध्ये गांधी यांच्याशिवाय रोमिला थापर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते गिरीश कर्नाड आणि संशोधक अनन्या वाजपेयी यांचा समावेश आहे. या स्वायत्त संस्था असून, देशवासीयांचे संसाधन आहे. एखादा राजकीय पक्ष, तत्कालीन सरकार, विचारसरणी अथवा मंत्रालयाच्या विभागाची ही खासगी मालमत्ता नाही, असे मत या बुद्धिजीवींनी या निर्णयाविरुद्ध काढलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. तीनमूर्ती ग्रंथालयाचे आवश्यक कार्य, दर्जा आणि स्वायत्ततेला नुकसान पोहोचविणे अथवा विकृत स्वरूप देणे कदापि स्वीकारार्ह नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारला ठणकावले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)