शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीबी’चा राज्याला विळखा

By admin | Updated: November 30, 2014 01:44 IST

क्षयरोगाने (एमडीआर-टीबी) देशात सर्वाधिक विळखा महाराष्ट्राला घातल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय क्षयरोग विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे.

रघुनाथ पांडे ल्ल नवी दिल्ली
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ क्षयाचा (टीबी) उपचार घेऊनही त्या औषधांनाही गुंगारा देणा:या जैवप्रतिरोधक क्षयरोगाने (एमडीआर-टीबी) देशात सर्वाधिक विळखा महाराष्ट्राला घातल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय क्षयरोग विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला  दिला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी रुग्णसंख्या वाढतच असल्याचेही नोंदविण्यात आलेले आहे.
एमडीआर-टीबी व क्षयाने मागील साडेतीन वर्षात राज्यात 22 हजार मृत्यू झाले असून, तीस वर्षाआतील तरुणांचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. चालू वर्षाच्या सप्टेंबर्पयत राज्यात 68 हजार 751 क्षयरुग्णांवर उपचार सुरू झाले असून, यातील साडेतीन हजारांवर रुग्ण एमडीआरचे आहेत. मुंबई, ठाणो सर्वाधिक व त्याखालोखाल पुणो, औरंगाबाद, नागपूर या महानगरांसह 23 जिल्ह्यांमध्ये  एमडीआर-टीबी पसरत असून, दररोज रुग्णांची होणारी वाढ आरोग्य विभागाची झोप उडवणारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या अहवालात एमडीआर-टीबीमध्ये भारत जगात 14व्या स्थानावर असून, त्यानंतर केंद्रीय क्षयरोग विभागाने दिलेल्या अहवालानुसार भारतात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटले की, औषधांची मात्र उपलब्ध असून, उपाय योजले जातील. 
हाती आलेल्या अहवालातील नोंदीनुसार, क्षय व प्रतिरोधक क्षय अशा दोन श्रेण्यांमध्ये क्षयाची मांडणी होत असून, महाराष्ट्र एचआयव्ही टीबीसाठी अतिजोखमीच्या असलेल्या देशातील नऊ राज्यांपैकी एक असून, आधीच प्रथम क्रमांकावर असताना एमडीआर-टीबीने (मल्टीड्रग रेजिटंन्स टय़ुबोरोक्युलॅसिस) वैद्यकीय यंत्रणोपुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या वर्षी 1 लाख 37,237 क्षयरुग्ण होते. त्यापैकी 4,98क् एमडीआर-टीबी होते. यंदाच्या पहिल्याच सहा महिन्यांत ही संख्या 3,4क्9 झाली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान (2,131), गुजरात (1,971), आंध्र प्रदेश (1893), उत्तर प्रदेश (1877) अशी रुग्णसंख्या आहे. 
 
अशी आहे स्थिती?
मागील तीन वर्षात 4 लाख 77,314 क्षयाचे तर 13 हजार 648 रूग्ण एमडीआर-टीबीचे नोंद झाले आहेत. राज्यात दरमहा 5क् हजारपेक्षा जास्त संशयित क्षयरोग रु ग्णांची थुंकी नमुन्याची तपासणी होते. 8 हजारपेक्षा जास्त क्षय रु ग्णांवर उपचार सुरू करण्यात येतात. वर्षभरात सुमारे 1.3 लाखापेक्षा जास्त रु ग्ण उपचार घेतात.
 
च्यात मुख्यत: 75 टक्के रु ग्णांमध्ये फुप्फुसांना बाधा होत असते. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ क्षयाचा उपचार घेतल्यावरही तो बरा होत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर एमडीआर-टीबीमध्ये होते.
 
च्क्षय रोग हा जीवाणूजन्य आजार असून, मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो. मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम टय़ुबोरोक्युलॅसिस प्रकारामुळे मानवामध्ये क्षयरोग होतो.