शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांना शिस्तपालन समितीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 03:08 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील लोकसभेच्या शिस्तपालन समितीने काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना सोमवारी नोटीस बजावून

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील लोकसभेच्या शिस्तपालन समितीने काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना सोमवारी नोटीस बजावून स्वत:ला ब्रिटिश नागरिक जाहीर करण्यासंदर्भातील आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे. तुम्ही कधी स्वत:ला ब्रिटिश नागरिक म्हटले होते काय? असा सवाल त्यांना करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सरकारवर महत्त्वाच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला. राहुल यांनीसुद्धा आपण हे प्रकरण योग्यरीत्या हाताळू असे सांगितले.भाजपचे खासदार महेश गिरी यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे तक्रार केली होती आणि अध्यक्षांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी शिस्तपालन समितीकडे वर्ग केली होती. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वासंदर्भात केलेल्या आरोपांवर योग्य कारवाई करण्याची मागणी गिरी यांनी आपल्या तक्रारीत केली होती. गांधी यांनी त्या देशात एक कंपनी सुरू करण्यासाठी स्वत:ला ब्रिटिश नागरिक सांगितले होते, असा दावा स्वामी यांनी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)