शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा सिंहस्थासाठी फ ायदेशीर : सरंगल

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ देशभरातून नव्हे, तर जगभरातून भाविक नाशिकला येणार असून, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे़ अचानक येणार्‍या आपत्तीला कसे तोंड द्यावे यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा फ ायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले़ यशदा व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिकार्‍यांसाठी तीनदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सरंगल बोलत होते़

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ देशभरातून नव्हे, तर जगभरातून भाविक नाशिकला येणार असून, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे़ अचानक येणार्‍या आपत्तीला कसे तोंड द्यावे यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा फ ायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले़ यशदा व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिकार्‍यांसाठी तीनदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सरंगल बोलत होते़
ते पुढे म्हणाले की, सिंहस्थात येणार्‍या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागणार आहे़ त्यामुळे साहजिकच त्यांच्या जबाबदारीत वाढ होणार आहे़ ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी प्रत्येकाने सिंहस्थ कुंभमेळा समजून घेतानाच त्याचे व्यवस्थापनही समजून घेणे गरजेचे आहे़ सिंहस्थात अचानक कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवू शकते. अशावेळी ती कशा प्रकारे सोडवावी याचे नियोजन करणे गरजेचे आहे़ कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या समजून घेणे गरजेचे असून, ते पुढील दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे़
एखादी घटना घडली तर ती कशी घडली, ती घडू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या याचे नियोजन करणे गरजेचे आहे़ सिंहस्थात येणारे लाखो भाविक शहरात कसे येणार, त्यासाठी किती गाड्या लागणार याचे सूक्ष्म नियोजन करून ती माहिती असणे गरजेचे आहे़ गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांबरोबरच सामान्य नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे़
या कालावधीत होणार्‍या कोणत्याही गर्दीकडे दुर्लक्ष न करता जागरूक राहून काळजी घ्यावी लागणार आहे़ या दृष्टिकोनातून पोलीस अधिकार्‍यांसाठी आयोजित करण्यात आलेली ही तीनदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा उपयुक्त ठरणार असल्याचेही सरंगल म्हणाले़ आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी यशदाचे संचालक डॉ़ संजय चहांदे, कर्नल सुपणेकर, राठोड आदिंसह अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

फ ोटो :- २० पीएचएमए ९०
यशदा व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल़ समवेत डॉ़ संजय चहांदे, कर्नल सुपणेकऱ