ऐनवेळी प्लॅटफार्म बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय
By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST
ऐनवेळी प्लॅटफार्म बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय
ऐनवेळी प्लॅटफार्म बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय
ऐनवेळी प्लॅटफार्म बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोयतांत्रिक दोष : धावपळ करत पोहोचावे लागते प्लॅटफार्मवरनागपूर : ऐनवेळी प्लॅटफार्म बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना आपले सामान घेऊन धावपळ करत संबंधित प्लॅटफार्मवर जाण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर एकूण ८ प्लॅटफार्म आहेत. मागील काही दिवसांपासून अचानक रेल्वेगाड्यांचे प्लॅटफार्म बदलण्याच्या घटनात वाढ झाली आहे. प्रवासी आपल्या बॅग, लहान मुले घेऊन कुटुंबासह आपली गाडी येणार असलेल्या प्लॅटफार्मवर पोहोचतात. परंतु गाडी येण्याच्या पाच मिनिटापूर्वी त्यांना अचानक गाडीचा प्लॅटफार्म बदलण्यात आल्याची सूचना उद्घोषणा प्रणालीवरून देण्यात येते. यामुळे धावपळ करीत प्रवाशांना आपल्या सामानासह आणि लहान मुलांना घेऊन संबंधित प्लॅटफार्मवर जाण्याची कसरत करावी लागते. यात अनेकदा घाईगडबडीत पायऱ्या चढताना आणि उतरताना पाय घसरून पडल्यामुळे गंभीर इजा होण्याची भीती राहते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आपल्या तांत्रिक दोषात दुरुस्ती करून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (प्रतिनिधी)........................