शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम २ वर्षांचा

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

एकनाथ खडसे यांची माहिती

एकनाथ खडसे यांची माहिती

पुणे : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणारी अडचण लक्षात घेऊन कृषी तंत्रज्ञान हा ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम २ वर्षांचा करण्याचे ४५ संस्थांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये आता संबंधित विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर थेट बी.एस्सी. ॲग्रीकल्चरच्या द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचेही ठरविण्यात आल्याचे राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
शेतकी शाळांमध्ये २ वर्षांचा शेती पदविका आणि कृषी तंत्रनिकेतनमध्ये तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान हा पदविका अभ्यासक्रम आहे. दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम हा मराठी माध्यमातून शिकविण्यात येतो. मात्र, ३ वर्षांचा अभ्यासक्रम सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविला जातो. ३ वर्षांचे अभ्यासक्रम २ वर्षांचे करून ते मराठी माध्यमातून शिकविण्याचे ४५ संस्थांचे प्रस्ताव मान्य झाले असल्याचे खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची ९१ वी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर ते बोलत होते.
पावसाने ओढ दिल्याने शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरण्यांसाठी बियाणांसाठी अनुदान दिले जाणार आहे. मात्र, किती ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, याचा अंदाज घेतला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील शेतक-यांना आपल्या पसंतीच्या कृषी निविष्ठा म्हणजे बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक आणि रासायनिक औषधे तसेच अवजारे खरेदी करता यावीत, यासाठी गुजरात पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्याचे खडसे यांनी सांगितले.
या परिषदेस कृषी आयुक्त विकास देशमुख, उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, साधन सामग्री विभागाचे संचालक डॉ. मधुकर घाग, संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत काकडे आणि प्रशासन विभागाच्या सहसंचालक शुभांगी माने आदी उपस्थित होते.