शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षित यांच्या "रस्त्यावरील गुंड" टिप्पणीवरून राजकारण पेटले! भाजपाने काँग्रेसला घेरले

By admin | Updated: June 12, 2017 16:47 IST

संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपाने काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 -  संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपाने काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज भाजपाने दीक्षित यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली. संदीप दीक्षित यांचे वक्तव्य लष्कराचे मनोबल खच्ची करणारे असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
 काल लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यावर टीका करताना संदीप दीक्षित यांनी त्यांची तुलना रस्त्यावरील गुंडाशी केली होती. त्यानंतर या वक्तव्याबाबत त्यांनी आपली माफीही मागितली होती. मात्र भाजपाने या विधानाचे भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. आज भाजपाच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दीक्षित यांच्यावर चौफेर टीका केली. त्या म्हणाल्या, "लष्कर सीमेवर देशाचे संरक्षण करत असते. त्याच्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य लष्कराचा अवमान करणारे आहे.  काँग्रेसचे नेते लष्कराचे योगदान दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे." 
संदीप दीक्षित यांनी बिपिन रावत यांच्या कार्यशैलीवर टीका करताना त्यांच्या आक्रमक वक्तव्ये करण्यावरून हे वक्तव्य केले होते.  "आपले लष्कर सशक्त आहे. त्याने सीमेवर पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हे गेल्या 70  वर्षांपासून सुरू  आहे. पाकिस्तान कागाळ्या करणे,  बाष्कळ बडबड करणे असल्याच गोष्टी करू शकते. पण आपले लष्करप्रमुखही जेव्हा रस्त्यावरील गुंडांप्रमाणे विधाने करतात तेव्हा वाईट वाटते," असे दीक्षित म्हणाले होते.