शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अम्मांच्या नावे दिनकरन यांचा पक्ष, राज्यात सत्तेवर येण्याचा केला दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:51 IST

अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते टीटीव्ही दिनकरन यांनी गुरुवारी नव्या पक्षाची घोषणा केली. दिवंंगत जयललिता यांच्या नावावर ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला.

मदुराई : अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते टीटीव्ही दिनकरन यांनी गुरुवारी नव्या पक्षाची घोषणा केली. दिवंंगत जयललिता यांच्या नावावर ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला. आमचा पक्ष राज्यात लवकरच सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शहरातील अनेक मार्गांवर दिनकरन यांचे बॅनर आणि होर्डिंग्ज लागले होते. यात त्यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’असा करण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमास माजी मंत्री व्ही. सेंदिल आणि पी. पलानीअप्पन, एस. अन्बळगन आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय, अपात्र ठरविण्यात आलेले आमदार आणि दिनकरन यांचे समर्थक उपस्थित होते. या बैठकीला आलेल्या नेत्यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या सरकारवर टीका केली आणि या सरकारमध्ये विश्वासघातकी लोक असल्याचा आरोप केला.दिनकरन यांना पक्षातील असंतुष्ट कार्यकर्ते आणि नेते यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचे आज अनावरण केले.त्यावर जयललिता यांचे हसरे छायाचित्र आहे. मदुराईजवळील कार्यक्रमात बोलताना दिनकरन म्हणाले की, नाव नसल्याने संघटनात्मक कार्य वाढविण्यास पक्ष कार्यकर्त्यांना अडचण येत होती. त्यामुळे आपण दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर आम्हाला प्रेशर कूकर हे चिन्ह वाटप करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे पक्षाचा विस्तार आता शक्य होणार आहे. (वृत्तसंस्था)>तामिळनाडूमध्ये वाढत चालले पक्षराज्यात आतापर्यंत द्रमुक, अण्णा द्रमुक, काँग्रेस, भाजपा हे प्रमुख पक्ष होते. याशिवाय रामदास यांचा पीएमके, वायको यांचा एमडीएमके हे पक्षही सक्रिय आहेत. दोन्ही डाव्या पक्षांची काही ठिकाणी ताकद आहे. कमल हासन व रजनीकांत हेही आता राजकारणात सक्रिय झाले आहे. दिनकरन यांनीही नवा पक्ष स्थापन केला. एकूणच तामिळनाडूमध्ये पक्षांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या शशिकला यांचे दिनकरन हे भाचे आहेत. डिसेंबर महिन्यात झालेल्या चेन्नईतील आरके नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.