शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

अकोल्याच्या जात पडताळणी समितीला दणका हायकोर्ट : अवमानना नोटीस जारी

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसर्‍या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी बिनडोकपणे वागून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना वेगवेगळे निकष लावत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशीच चूक करणार्‍या अकोला ...


नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसर्‍या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी बिनडोकपणे वागून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना वेगवेगळे निकष लावत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशीच चूक करणार्‍या अकोला येथील विभागीय जात वैधता पडताळणी समितीच्या तीन अधिकार्‍यांना अवमानना नोटीस बजावून दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
एच. पी. तुमोड (समिती अध्यक्ष), भीमराव खंडाते व प्राजक्ता इंगळे (दोन्ही सदस्य) अशी अधिकार्‍यांची नावे आहेत. समितीने राजपुत भामटा (विमुक्त जाती) जातीचा दावा फेटाळल्यामुळे बुलडाणा येथील आशिष सोळंकी, सिद्धेश्वर मोरे व प्राजक्ता गायकवाड यांनी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. मोरे यांच्या चुलत भावाला, गायकवाड यांच्या वडिलाला, तर सोळंकी यांच्या सख्ख्या बहिणीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परंतु, या तिघांना वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आले. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी समितीला अवमानना नोटीस बजावून दणका देतानाच तिन्ही याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांत वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शासनाने याचिकाकर्त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये खर्च द्यावा आणि शासनाला वाटल्यास ही रक्कम अधिकार्‍यांकडून वसुल करता येईल असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. एन. बी. काळवाघे यांनी बाजू मांडली.