शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय सिंहांची गोवा, कर्नाटकच्या प्रभारीपदावरून उचलबांगडी

By admin | Updated: April 29, 2017 22:10 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी आता ए. चेल्लकुमार हे गोव्याचे प्रभारी तर कर्नाटकच्या प्रभारीपदी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्त करण्यात आली आहे. 
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही तेथे सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले नाही. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी झाल्याचे बोलले जात आहे.
 
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही सत्ता स्थापन करू न शकल्याने काँग्रेसवर अनेकांनी उपहासात्मक टीका केली. यावर भाजपानं काँग्रेसच्या जखमेवर मिठ चोळत म्हटले होते की, "दिग्विजय सिंह गोव्यात सुट्टी साजरी करत  होते". शिवाय, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणादरम्यान दिग्विजय सिंहांचे आभार मानले होते. दिग्विजय सिंग यांनी काहीही न केल्याने गोव्यात भाजपलास सत्ता स्थापन करण्यात यश आलं, अशी उपहासात्मक टीका त्यांनी दिग्विजय सिंहांवर केली होती.  
 
दरम्यान, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन येथे नवीन राजकीय रणनीती आखून पक्षाचा प्रभारी बदलण्यात आल्याची चर्चा आहे.  
 
काही दिवसांपूर्वी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी पार्टीनं गोव्यामध्ये सत्तास्थापन न केल्याने दिग्विजय सिंह आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. 21 आमदार निवडून आलेले असतानाही दिग्विजय यांनी राज्यपालांकडे जाण्यापासून रोखले, असेही ते म्हणालेत. 
 
दरम्यान, सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपाल प्रस्ताव येण्याची प्रतीक्षा करायला हवी, असा सल्ला दिग्विजय यांनी त्यावेळी दिला. दिग्विजय यांच्या सांगण्यावरुन पार्टीनं थांबवण्याचा निर्णय घेतला. 
 
कारण नियमाप्रमाणे राज्यपाल निवडणुकीतील निकालानुसार सर्वात मोठ्या पक्षाला सरकारस्थापनेचं निमंत्रण देतात. पण या सगळ्या कालावधीत भाजपाने लहान लहान पक्षांची मोट बांधत बहुमताचा आकडा गाठला व सरकार स्थापन केले. दरम्यान घडल्या प्रकाराबाबत दिग्विजय सिंह यांनी गोव्याच्या जनतेची माफीही मागितली.