शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांना डिजिटल पंख!

By admin | Updated: July 2, 2015 04:19 IST

बदलत्या काळात कोट्यवधी भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आखलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भव्य समारंभात उद््घाटन केले.

नवी दिल्ली : बदलत्या काळात कोट्यवधी भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आखलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भव्य समारंभात उद््घाटन केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून साकारलेली डिजिटल शक्ती अवघे विश्व कवेत घेऊ पाहात असल्याच्या स्थितीचे भान दाखवत १८ लाखांना रोजगार देत तरुणाईच्या शक्तीला तंत्रज्ञानाच्या शक्तीशी जोडण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्याला हातभार लावण्यासाठी देशातील उद्योग जगताने तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. अनेक उद्योगपतींनी या चळवळीत आपणही पंतप्रधानांबरोबर असल्याचे आश्वासन दिले आहे. भरगच्च गर्दीच्या साक्षीने इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये डिजिटल इंडियाच्या बोधचिन्हाचे दिमाखदार प्रकाशनही झाले. डिजिटल शक्तीला समजून घेणे आवश्यक असून, त्यातून कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने पूर्ण होतील याची मला खात्री आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाविषयी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की ही काळाची गरज आहे. जर आपण या बदलाला समजून घेतले नाही तर जग दूर जाईल, आपण पाहात राहू. या प्रकल्पाचा भाग म्हणून १ ते ७ जुलै हा डिजिटल सप्ताह म्हणून देशभरात साजरा होणार आहे. डिजिटल वीकची घोषणा लोकांमध्ये जागरूकता व सहभाग वाढविण्यासाठी आहे. डिजिटल इंडियाची मुख्य उद्दिष्टे-डिजिटल इंडियाचे मुख्य उद्दिष्ट भारतात क्रांती घडविण्याचे असून, भारताचा कायापालट डिजिटल क्षमता असणाऱ्या व अर्थकारणाची माहिती असणाऱ्या समाजात केला जाणार आहे. या एका योजनेअंतर्गत अनेक नव्या संकल्पना आहेत.-भारतीय समाज अर्थकारणाची माहिती असणारा असावा, तसेच सरकारचे सुशासन प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.-इलेक्ट्रॉनिक्स खाते व माहिती तंत्रज्ञान खाते यांनी एकत्रितपणे ही योजना तयार केली असून, केंद्र सरकारची अनेक खाती व राज्य सरकारांची मदत ही योजना तयार करण्यासाठी झालेली आहे. या योजनेवर नियंत्रण ठेवणाऱ्या समितीचे पंतप्रधान अध्यक्ष आहेत.डिजिटल इंडिया म्हणजे जनतेला सेवा देण्यासाठी एक मोहीम आहे.- अरु ण जेटली, केंद्रीय अर्थमंत्रीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वोत्कृष्ट आणि डिजिटल विश्वातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत.- अनिल अंबानी, उद्योगपतीडिजिटल इंडियातील पुढाकार देशाला अत्यल्प काळात बदलू शकतो. -सुनील मित्तल, उद्योगपतीडिजिटल इंडियासाठी मोदी यांनी वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी ठेवली आहे. आम्हाला या संस्मरणीय क्षणाचा अभिमान आहे.-कुमार मंगलम बिर्ला, उद्योगपतीनागरिकांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी हे एक पहिले सक्षम पाऊल आहे.- अझीम प्रेमजी, उद्योगपतीआम्ही ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करीत आहोत.- सायरस मिस्त्री, टाटा समूहाचे अध्यक्ष