शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारात 23 टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: July 16, 2017 20:28 IST

नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेत डिजिटल अर्थव्यवस्थेत काय काय बदल झाले आहेत? यावर संसदेच्या अर्थ खात्याच्या स्थायी समितीसमोर काही अधिकाऱ्यांनी आपले अहवाल सादर केले त्यात ही माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 : नोटाबंदीनंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात केवळ 7 टक्के तर एकूण डिजिटल व्यवहारात 23 टक्के वाढ झाली आहे. एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याने संसदीय समितीला ही माहिती दिली आहे. डिजिटल व्यवहारात सर्वाधिक वाढ युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात झाली आहे. नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेत डिजिटल अर्थव्यवस्थेत काय काय बदल झाले आहेत? यावर संसदेच्या अर्थ खात्याच्या स्थायी समितीसमोर काही अधिकाऱ्यांनी आपले अहवाल सादर केले त्यात ही माहिती समोर आली आहे.

या माहितीनुसार सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवहारात 23 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर2016 मध्ये हे व्यवहार 22.4 मिलियन होते. मे 2017 मध्ये ते 27.5 मिलियन झाले आहेत. युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात सर्वाधिक वाढ झाली आहे. नोव्हेंबर2016 मध्ये ही वाढ प्रति दिवस एक मिलियन एवढी होती. मे 2017 मध्ये ही वाढ 30 मिलियन एवढी झाली आहे. नोटाबंदीच्या पूर्वी या व्यवहारांची संख्या 1.2 मिलियन होती. ती आता 2.2 मिलियन झाली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात मात्र केवळ 7 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये हे व्यवहार 6.8 मिलियनचे होते. मे 2017 मध्ये प्लास्टिक कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार 7.3 मिलियन एवढे झाले.

दरम्य़ान, 8 नोव्हेंबर 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदी झाल्यानंतर भ्रष्टाचार दूर होईल आणि काळा पैसा बाहेर येईल असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. तसंच पर्यायी नोटा म्हणून 500आणि 2 हजारांच्या नोटाही चलनात आणल्या गेल्या. तसंच डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देऊन तशा प्रकारे व्यवहार करावेत असंही आवाहन करण्यात आलं. मात्र हे प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढलेलं नाही असंच समोर आलेल्या टक्केवारीवरून दिसतं आहे.