शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पाकिस्तानी बोटीवरील वक्तव्यावरून डीआयजींचा माफीनामा

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी. के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.

नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी. के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.
पाकमधून आलेल्या या बोटीत दहशतवादी होते आणि ही बोट भारतीत सागरी हद्दीत आल्यावर तिला उडविण्याचे आदेश आपणच दिले होते, असे वक्तव्य करून लोशाली यांनी सरकारला चांगलेच अडचणीत आणले होते; परंतु ही बोट उडविण्याचे आदेश लोशाली किंवा अन्य कुणीही दिलेले नसून दहशतवाद्यांनीच पकडले जाण्याच्या भीतीने बोटीसह स्वत:ला उडविल्याचे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले होते. आपल्या वक्तव्यानंतर लोशाली यांनी तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला पत्र लिहून आपल्या आचरणाबद्दल माफी मागितली आहे.
दरम्यान, लोशाली यांनी मागितलेली माफी समाधानकारक नसल्याचे तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला आढळून आले आहे आणि याबाबत विस्तृत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने याआधीच लोशाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, हे येथे उल्लेखनीय. (लोकमत न्यूज नेटवर्क)