शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरवरील एक्स्पायरी डेट केली का चेक? कशी समजते सिलिंडरची एक्स्पायरी डेट? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 06:51 IST

Gas Cylinder: सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही. परंतु हे धोक्याचे आहे. ही तारीख तपासून घेणे गरजेचे आहे. 

नवी दिल्ली - गॅस संपताच नव्या सिलिंडरसाठी ऑर्डर दिली जाते. कितीही घाईगडबड असली तरी लोक सिलिंडर कुठे लीक तर झालेला नाही ना याची खातरजमा करून घेतात. त्याचे वजन तपासले जाते परंतु सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही. परंतु हे धोक्याचे आहे. ही तारीख तपासून घेणे गरजेचे आहे. 

कशी समजते सिलिंडरची एक्स्पायरी डेट?  - अक्षरे सिलिंडरच्या मुदतबाह्य होणारा महिना दर्शविते आणि अंकातून कोणत्या वर्षी मुदतबाह्य होणार हे दर्शवितात. - १२ महिन्यांची विभागणी चार गटांमध्ये करून त्यांना अनुक्रमे ए, बी, सी आणि डी अशी नावे दिली जातात. 

यासाठी कुठे पाहायचे? सिलिंडर नीट निरखून पाहिला असाल तर त्यावर तीन पट्ट्या असतात. त्यावर ए-२३, बी-२४ किंवा सी-२५ असे नंबर लिहिलेले असतात. या क्रमांकांवरूनच  ए-२४ चा अर्थ असा आहे की सिलिंडर २०2४ या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान एक्स्पायर होईल. डी-२७ चा अर्थ असा की सिलिंडर २०२७ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदतबाह्य होईल. 

या महिन्यात होणार अयोग्यए    : जानेवारी ते मार्चबी    : एप्रिल ते जून सी    : जुलै ते सप्टेंबर डी    : ऑक्टोबर ते डिसेंबर  

सिलिंडरचे लाइफ किती असते? सामान्यपणे एका एलपीजी गॅस सिलेंडरची लाईफ १५  वर्षे इतकी असते. वापरात असताना सिलिंडर दोनवेळा तपासणीसाठी पाठवला जात असतो. पहिली चाचणी १० वर्षे तर दुसरी त्यानंतर ५ वर्षांनी केली जात असते. तपासणीवेळी सिलिंडरची हायड्रो टेस्ट केली जाते. पाच पट प्रेशरने तो टिकेल का हे तपासले जाते. चाचणीत अयोग्य आढळल्यास सिलिंडर नष्ट केला जातो.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर