शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी येणार आता ‘हीरा’

By admin | Updated: June 7, 2017 05:56 IST

नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी निती आयोग आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ‘हीरा’ आणण्याचे ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी निती आयोग आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ‘हीरा’ आणण्याचे ठरविले आहे. हीरा म्हणजे हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) गुंडाळण्यात येणार आहे. उच्च शिक्षणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हीरा स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी आधी अर्थातच विद्यापीठ अनुदान आयोग व तंत्रशिक्षण परिषद बरखास्त करण्यात येईल. विद्यापीठ अनुदान आयोग ६१ वर्षांपूर्वी स्थापन झालेली केंद्रीय पातळीवरील सर्वोच्च संस्था आहे, तर तंत्रशिक्षण परिषद ही नावाप्रमाणेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसंबंधातील केंद्रीय संस्था आहे. अशा दोन संस्थांपेक्षा एकच केंद्रीय संस्था असावी, या उद्देशाने ‘हीरा’ स्थापन करण्यात येईल. त्यासाठी कायदा करावा लागेल, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. >नव्या रचनेवर सुरू झाले काम शिक्षण क्षेत्रातील दोन संस्था गुंडाळून त्याऐवजी एकच केंद्रीय संस्था आणण्याचा विचार बराच काळापासून सुरू होता. केंद्र सरकारने मार्चमध्येच त्याला मान्यता दिली होती. आता मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि निती आयोगाने हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी स्थापण्यासाठी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली असून, त्यात निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. के. शर्मा यांचा समावेश आहे. समितीच्या अन्य सदस्यांसह हे दोघे हीराच्या रचनेवर काम करीत आहेत.>यूपीएच्या काळातील शिफारस आता लागूविद्यापीठ अनुदान आयोग संपुष्टात आणण्याची शिफारस यशपाल समिती आणि हरी गौतम समितीनेही केली होती. पण त्याची यूपीए सरकारने अंमलबजावणी केली नाही. आता ती करण्यात येत आहे, असे सांगण्यात येते. >नेमका काय होईल बदल? : विद्यापीठ अनुदान आयोग व तंत्रशिक्षण परिषद यांच्याऐवजी उच्च शिक्षणासाठी एकच नियामक यंत्रणा लागू केल्यास कारभारात सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे म्हणणे आहे.