शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरहद्दीवर धुमश्चक्री सुरूच

By admin | Updated: October 9, 2014 05:01 IST

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू व १५ जण जखमी

हरीष गुप्ता, जम्मू/नवी दिल्लीजम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू व १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीतील ३७ चौक्यांवर तोफा डागल्या. त्यात १५ पाकिस्तानी मारले गेले. पाकिस्तानी तोफा थंडावतील तेव्हाचचर्चा होऊ शकेल, असा पवित्रा भारताने घेतला आहे. पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. प्रत्युत्तर कसे आणि किती काळ द्यायचे याचे अधिकार बुधवारी दिल्लीत लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांच्यासमवेत झालेल्या विशेष बैठकांनंतर केंद्र सरकारने लष्कराला दिले आहेत. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांशी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी लष्करप्रमुखांशी चर्चा केली. याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्करी महासंचालक) पातळीवर आठ मिनिटे चर्चा झाली, पण परस्परांवर गंभीर आरोप झाल्याने तोडगा निघू शकला नाही. पाककडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमाभागांतील आठ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे़ मंगळवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने १९२ किमी लांबीच्या सीमेवरील ५० सीमा चौक्या आणि ३५ निवासी वस्त्यांना लक्ष्य करीत तुफान गोळीबार चालवला आहे़