शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोतर सोडायला येते

By admin | Updated: May 20, 2015 02:35 IST

एका रशियन नेत्याच्या पत्नीला माझ्या धोतराबद्दल औत्सुक्य होते. मी तुम्हाला धोतर कसे परिधान करायचे ते शिकवू शकणार नाही; मात्र धोतर कसे सोडायचे हे शिकवू शकतो,

बाबूलाल गौर : काँग्रेसकडून माफीची मागणीभोपाळ : एका रशियन नेत्याच्या पत्नीला माझ्या धोतराबद्दल औत्सुक्य होते. मी तुम्हाला धोतर कसे परिधान करायचे ते शिकवू शकणार नाही; मात्र धोतर कसे सोडायचे हे शिकवू शकतो, पण तेही आत्ताच नाही, नंतर, असे मी सांगितले होते, असा किस्सा सांगत मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी नवा वाद उभा केला आहे. गौर यांनी जाहीररीत्या अश्लिल विधान केले असून त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.८५ वर्षीय गौर यांनी याआधीही लैंगिकतेबद्दल विधाने करीत वाद ओढवून घेतला आहे. भाजपच्या अधिवेशनात त्यांनी धोतरासंबंधी विधान केले. पोलिसांपर्यंत प्रकरण गेले तरच तो बलात्कार मानला जातो. बलात्कार हा सामाजिक गुन्हा असून तो महिला आणि पुरुषावर निर्भर असतो, कधी ते योग्य तर कधी चुकीचे असते. तक्रार केली जात नसेल तर काहीही होत नाही, असे विधान गौर यांनी यापूर्वी केले होते. (वृत्तसंस्था)तो किस्सा रशिया भेटीचा...गौर यांनी भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यकर्त्यांचे लक्ष स्वत:कडे खिळवून ठेवण्याच्या प्रयत्नात तरुणपणच्या रशिया भेटीचा किस्सा सांगितला. रशियाच्या स्थानिक नेत्याच्या पत्नीने मला माझे धोतर पट्ट्याविना एकाच जागी कसे राहते, याबाबत कुतूहलाने प्रश्न विचारला होता. त्यानंतर मी तिला धोतर कसे सोडायचे ते मला माहीत आहे, पण खासगीत असे म्हणालो होतो, असे त्यांनी सांगताच सभागृहात एकच हंशा पिकला. गौर हे शिवराजसिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेत. ते यापूर्वी मुख्यमंत्रीही राहिले आहेत.रशियन महिलेने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा मी अन्य एका महिलेला रोखले. मी तिला रोखले नसते तर भाजपने मला तिकीटच दिले नसते असे गौर गमतीने म्हणाले. रशियन महिला सुदृढ असतात. रशियन महिला माझ्या कपाळाचे चुंबन घेत असल्याचे छायाचित्र उपलब्ध करवून देण्यात आले असते तर भाजपने मला पहिल्याच प्रयत्नात तिकीट दिले नसते, असे ते विनोदाने म्हणाले.