शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोतर प्रकरणावरून क्लबला फटकारले

By admin | Updated: July 16, 2014 23:17 IST

खासगी क्लबचे हे कृत्य तामिळ संस्कृतीचा अपमान असल्याचे सांगून, या क्लबचे परवाने रद्द करण्यासह कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

चेन्नई : तामिळनाडूतील परंपरागत वेशभूषा म्हणून प्रचलित असलेले धोतर घालून गेलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन क्लबने प्रवेश नाकारल्याप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता यांनी संबंधित क्लबला फटकारले असून याबाबत लवकरच एक नवा कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. खासगी क्लबचे हे कृत्य तामिळ संस्कृतीचा अपमान असल्याचे सांगून, या क्लबचे परवाने रद्द करण्यासह कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.अशा तऱ्हेच्या घटनांना रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या सत्रात एक कायदा लागू करण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस व भाजपाने स्वागत केले आहे. ११ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डी. हरिपरंतामन यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन क्लबमध्ये ते धोतर घालून आले या कारणासाठी प्रवेश नाकारला होता. या घटनेचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटून निदर्शने करण्यात आली होती. विधानसभेत या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या घटनेचे संबंधित क्लबकडे स्पष्टीकरण मागितले असल्याची माहिती दिली. (वृत्तसंस्था)