सुराणा ज्वेलर्सच्या अंगठी महोत्सवातील धनश्री गेडाम विजेत्या
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
नाशिक : सुराणा ज्वेलर्सच्या अंगठी महोत्सवातील एक लाख रुपयांच्या डिझायनर ड्रेसच्या मानकरी धनश्री गेडाम ठरल्या असून, ५ हजार रु. इतर चार डिझायनर ड्रेसचे विजेते डी. मुजूमदार, हुसेन, सुधाकर जाधव, प्रांजल सरपोतदार ठरले आहेत.
सुराणा ज्वेलर्सच्या अंगठी महोत्सवातील धनश्री गेडाम विजेत्या
नाशिक : सुराणा ज्वेलर्सच्या अंगठी महोत्सवातील एक लाख रुपयांच्या डिझायनर ड्रेसच्या मानकरी धनश्री गेडाम ठरल्या असून, ५ हजार रु. इतर चार डिझायनर ड्रेसचे विजेते डी. मुजूमदार, हुसेन, सुधाकर जाधव, प्रांजल सरपोतदार ठरले आहेत.यावेळी सादर झालेल्या दागिन्यांच्या हिंदी-मराठी चित्रपटगीतांचा सुराणा ज्वेलर्सने आयोजित केलेल्या अंगठी महोत्सवामध्ये भाग्यवान ग्राहकांना डिझायनर ड्रेस हे बक्षीस प्रथमच दिले जाणार होते. त्यामुळे गृहिणींचा उत्तम प्रतिसाद या महोत्सवाला मिळाला. प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ड्रेस धनश्री गेडाम यांनी मिळाला. यावेळी गायिका अमृता दहिवेलकर, रेखा परदेशी, अमोल पाळेकर, संजय तायडे यांनी सरस गाणी सादर केली त्याला उपस्थितांची उत्तम दाद मिळाली. साथसंगत फारुख पिरजादे, अभिजित शर्मा, अनिल धुमाळ, प्रसाद भालेराव, नीलेश सोनवणे, अविनाश गांगुर्डे आदि वादकांनी केली. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या मारकर व मनीषा क्षेत्रकल्याणी यांनी गीतअलंकार कार्यक्रमाचे निवेदन केले. कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवयानी फरांदे, महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरुमित बग्गा, उद्योजक अशोक कटारिया, डॉ. संतोष मंडलेचा आदि मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे संपतलाल सुराणा, शशिकांत सुराणा, अजित सुराणा, श्रेणीक सुराणा, सम्यक सुराणा, सिद्धार्थ सुराणा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केले. या कार्यक्रमाला ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)---