नागपूरच्या धर्तीवर जबलपूरचा विकास-२
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
बॉक्स.. राजकारणापूर्वी रंगभूमी स्वाती गोडबोले या लग्नापूर्वी नागपुरात राहत होत्या. नागपुरातूनच त्यांनी बी.कॉम व बीए लिटरेचरमध्ये शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर त्या जबलपूरला आल्या. नागपुरात असतांना त्यांचा राजकारणाशी कुठलाच संबंध नव्हता. त्या रंगभूमीशी जुळल्या होत्या. कारण त्यांचे वडील स्वत: रंगकर्मी होते. त्यांच्यामुळेत त्या नाट्यवलय संस्थेशी जुळल्या आणि नाटकांमध्ये अभिनय करीत होत्या. ...
नागपूरच्या धर्तीवर जबलपूरचा विकास-२
बॉक्स.. राजकारणापूर्वी रंगभूमी स्वाती गोडबोले या लग्नापूर्वी नागपुरात राहत होत्या. नागपुरातूनच त्यांनी बी.कॉम व बीए लिटरेचरमध्ये शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर त्या जबलपूरला आल्या. नागपुरात असतांना त्यांचा राजकारणाशी कुठलाच संबंध नव्हता. त्या रंगभूमीशी जुळल्या होत्या. कारण त्यांचे वडील स्वत: रंगकर्मी होते. त्यांच्यामुळेत त्या नाट्यवलय संस्थेशी जुळल्या आणि नाटकांमध्ये अभिनय करीत होत्या. हिंदी आणि मराठीतील अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. प्रसिद्ध नाटक जाणता राजा मध्ये त्यांनी एक लहानशी भूमिका केली होती. लग्नानंतर १९९३ मध्ये त्या निवडणुकीदरम्यान माजी खासदार जयश्री बॅनर्जी यांच्या प्रचारात सक्रिय झाल्या. तेथूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. १९९८ मध्ये त्या महिला मोर्चात सक्रिय झाल्या. २००४ मध्ये नगरसेवकाची निवडणूक लढल्या. यानंतर पक्षाच्या विविध घडामोडींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. २०१५ मध्ये पक्षाने त्यांना महापौर पदासाठी उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या.