शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान इनाम जमिनीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार

By admin | Updated: April 25, 2016 00:57 IST

संतराम पाटील : देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेचा मेळावा

कोल्हापूर : देवस्थानच्या जमिनी या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करा, सात-बारा पत्रकी संबंधित शेतकऱ्यांची नावे ‘मालकी हक्क’ सदरात नोंद करा, आदी मागण्यांसाठी बुधवारी (दि. २७) मुंबईत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात घेण्यात आला. येथील टाऊन हॉल उद्यानात करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संतराम पाटील हे होते.या बैठकीत, देवस्थानच्या जमिनीच्या विकासासाठी मध्यम मुदत व दीर्घ मुदतीची कर्जे, पीक कर्जे मिळण्याची तरतूद करावी, देवस्थानच्या जमिनी छुप्या मार्गाने शेतकऱ्यांना वेठीस धरून सुरू असलेली खरेदी-विक्री बंद करावी, इनामी जमिनीसंबंधी शासकीय समितीवर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी घ्यावा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर संघटनेचा प्रतिनिधी घ्यावा. जमिनींवर वारसा नोंदी करून मिळाव्यात. हिंदू राजांनी मुस्लिम देवस्थानला दिलेल्या जमिनी गेल्या सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्या वक्फ बोर्डाला जोडल्या त्या पूर्ववत कराव्यात, आदीमागण्या यावेळी मांडण्यात आल्या. मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संतराम पाटील, मोडीतज्ज्ञ वसंतराव सिंघन, करवीर तालुका अध्यक्ष किरण पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष कमलाकर कांबळे, जिल्हा सचिव वसंतराव चांदूरकर, विजय पाटील आदींनी आपले विचार मांडले.यावेळी बुधवारी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांच्यासोबतच्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मेळाव्यास प्रकाश कांबळे, खंडू चरणकर, शिवाजी पिंजरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)