शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील जुलैअखेर

By admin | Updated: June 11, 2014 02:05 IST

नरेंद्र मोदी सरकारमधील सर्व मंत्र्यांना येत्या दोन महिन्यांत त्यांची संपत्ती, कर्ज आणि व्यापारी हितसंबंध याबाबतचा तपशील पंतप्रधानांकडे सादर करावा लागणार आह़े

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारमधील सर्व मंत्र्यांना येत्या दोन महिन्यांत त्यांची संपत्ती, कर्ज आणि व्यापारी हितसंबंध याबाबतचा तपशील पंतप्रधानांकडे सादर करावा लागणार आह़े
या मंत्र्यांना एकार्थाने कुठल्याही प्रकारच्या व्यवसायापासून स्वत:ला दूर ठेवण्यास सांगितले गेले आह़े सरकारमध्ये वर्णी लागण्याआधी ज्या कुणाचा कुठल्याही प्रकारचा व्यापार व उद्योगाचे व्यवस्थापन वा वितरणाशी संबंध असल्यास तो सर्व प्रकारे संपुष्टात आणावा, असे मंत्र्यांना सांगण्यात आले आह़े
गृहमंत्रलयाने नव्याने जारी केलेल्या मंत्र्यांसाठीच्या आचारसंहितेत हे निर्देश देण्यात आले आहेत. नव्या सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर गृहमंत्रलयाने ही आचारसंहिता पुन्हा जारी केली आह़े विशेष म्हणजे या आचारसंहितेचे योग्यरीत्या पालन होते आहे वा नाही, यावर खुद्द पंतप्रधान लक्ष ठेवून असणार आह़े कुठल्याही मंत्र्याने प्रशासकीय अधिका:यांची राजकीय निष्पक्षता कायम ठेवत त्यांना कुठलेही बेकायदेशीर वा नियमबाह्य काम करण्यास सांगू नय़े सरकारला सेवा पुरविणा:या कुठल्याही उद्योगात मंत्र्यांच्या कुटुंबातील कुठल्याही नातेवाईकाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असू नये, असे या आचारसंहितेत म्हटले आह़े मंत्र्यांचे पती वा पत्नी किंवा आश्रितांना अन्य देशाच्या मिशनमध्ये नोकरी करण्यास पूर्णपणो बंदी असेल, असेही यात नमूद        आह़े  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
 
 
पंतप्रधान मोदींची आपल्या मंत्र्यांसाठी कडक आचारसंहिता; घातली 
अनेक बंधने
-मंत्र्यांसाठी जारी आचारसंहितेनुसार, प्रत्येक मंत्र्याला दरवर्षी 31 ऑगस्टर्पयत गतवर्षीची स्वत:ची संपत्ती आणि उधारीबाबतचा तपशील पंतप्रधानांना सादर करावा लागेल.
-मंत्री कुठलाही उद्योग-व्यवसाय सुरूकरणार नाहीत वा त्यात सामील होणार नाही़
-सरकारला सेवा वा उत्पादन पुरवठा करणारे उद्योग-व्यवसाय तसेच सरकारचे परवाने, कोटा, लीजवर अवलंबून असलेल्या कुठलाही व्यवसाय वा उद्योगात मंत्र्याच्या कुटुंबातील सदस्यांनी भागीदारी वा अन्य प्रकारच्या लाभापासून दूर राहावे.
-मंत्री स्वत: वा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून राजकीय, सेवाभावी वा अन्य कुठल्याही कारणास्तव देणगी स्वीकारू शकणार नाहीत.
 
-मंत्र्यास कुठल्याही नोंदणीकृत सोसायटी, सेवाभावी संस्था वा मान्यताप्राप्त संस्था तसेच राजकीय पक्षासाठी कुठलीही देणगी वा धनादेश मिळत असेल तर त्याने तात्काळ तो संबंधित संस्थेर्पयत पोहोचता करावा.
-नोंदणीकृत सोसायटी, सेवाभावी संस्था वा अन्य कुठल्याही मान्यताप्राप्त संस्था तसेच राजकीय पक्षाशिवाय अन्य कुणासाठी धन गोळा करण्याच्या प्रपंचात पडू नये.
-कुठलाही मंत्री सरकारला आपली अचल संपत्ती विक्री वा सरकारकडून संपत्ती खरेदी करणार नाही़