शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नक्षल प्रभावित भागात असूनही UPSC परीक्षेत मिळवला 99वा क्रमांक

By admin | Updated: June 1, 2017 13:58 IST

नक्षलवाद प्रभावित ठिकाणांपैकी एक असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील एका तरुणीने युपीएससी परीक्षेत 99 वा क्रमांक मिळवला आहे

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 1 - देशात नक्षलवाद प्रभावित ठिकाणांपैकी एक असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील एका तरुणीने युपीएससी परीक्षेत 99 वा क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत नम्रताने घवघशीत यश मिळवत 99 वा क्रमाक पटकावला आहे. के पी एस भिलाई शाळेत शिकलेल्या नम्रता जैनने भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी मिळवलेली आहे. तिचे वडिल जवाहरलाल जैन एक व्यवसायिक असून आई किरण गृहिणी आहे. 
 
नम्रताने युपीएससीची परिक्षा देण्याची ही दुसरी वेळ होती. प्राथमिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नम्रकाने दंतेवाडा जिल्हा प्रशासनातर्फे चालवण्यात येणा-या एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता. यामुळे नम्रताला खूप मदत मिळाली. दंतेवाडा जिल्हा प्रशासन प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी गेल्या चार वर्षांपासून कोचिंग सेंटर चालवत आहे. 
 
जपान दौ-यावर गेलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी नम्रताचं कौतूक करत शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रताने मिळवलेलं यश जिल्ह्यातील इतर तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 
विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रात प्रथम
 
पुण्याची विश्वांजली गायकवाड ही राज्यात प्रथम आली आहे. देशभरातून १,०९९ जण उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली आहे.
 
विश्वांजली गायकवाड देशात ११वी आली असून, स्वप्निल खरे देशात ४३वा आला आहे. विश्वांजली दुसऱ्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाली असून, तिला परराष्ट्र सेवेत जायचे आहे. याशिवाय स्वप्निल रवींद्र पाटील (५५), भाग्यश्री दिलीप विसपुते (१०३), प्रांजली लहेनसिंग पाटील (१२४), सूरज अनंता जाधव (१५१), स्नेहल सुधाकर लोखंडे (१८४), अनुज मिलिंद तारे (१८९), विदेह खरे (२०५), राहुल नामदेव धोटे (२०९), अंकिता धाकरे (२११), योगेश तुकाराम भारसट (२१५), श्रद्धा पांडे (२१९), किरण खरे (२२१), स्वप्निल थोरात (६००), अभिषेक टाले (८७७) हे राज्यातील विद्यार्थी चमकले आहेत़