शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम असूनही कलाम हे खरे राष्ट्रभक्त - महेश शर्मा

By admin | Updated: September 18, 2015 20:58 IST

एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम असून एक महान राष्ट्रभक्त आणि मानवतावादी व्यक्ती होते असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ - एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम असून एक महान राष्ट्रभक्त आणि मानवतावादी व्यक्ती होते असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे. मात्र शर्मा यांच्या विधानाने नवीन वाद निर्माण झाला असून  मुसलमानांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याचा हक्क महेश शर्मा यांना कोणी दिला असा सवाल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचे कौतुक केले. मुस्लिम असूनसुद्धा कलाम हे एक खरे राष्ट्रभक्त होते. दिल्लीतील औरंगजेब रोडला त्यांचे नाव देण्याचा निर्णय योग्यच होता, कलाम यांचे कार्य देशासाठी तरुणांसाठी प्रेरणादायीच आहे असे त्यांनी म्हटले आहे. कलाम यांच्या कार्याचा गौरव करताना महेश शर्मा यांनी 'मुस्लिमसुद्धा' असा शब्दप्रयोग केल्याने त्यावर नाराजी व्यक्त होत आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरही शर्मा यांच्यावर टीका होत असून मुस्लिम व्यक्ती देशभक्त नसते का असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. महेश शर्मा यांनी केलेले विधान दुर्दैवी असून मोदी त्यांना मंत्रिमंडळात ठेवतील का असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.