डिचोलीतील शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न संस्कृत प्रसारासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे उपसभापती अनंत शेट
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
डिचोलीतील शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न
डिचोलीतील शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न संस्कृत प्रसारासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे उपसभापती अनंत शेट
डिचोलीतील शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्नसंस्कृत प्रसारासाठी प्रत्येकाने योगदान द्यावेउपसभापती अनंत शेटडिचोली : संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून गोव्यातील प्रत्येक विद्यालयात संस्कृतचा प्रसार करताना प्राथमिक स्तरापासून बालमनावर या भाषेची रूची लावण्यासाठी शिक्षकांनी संघटित प्रयत्न करावेत व संस्कृतला घराघरात पोचवो, असे आवाहन उपसभापती अनंत शेट यांनी डिचोलीतकेले.संस्कृत भारतीतर्फे संस्कृत शिक्षकांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केंद्र धाम डिचोली येथे करण्यात आले.व्यासपीठावर प्रसाद उमर्ये, मधुकर सासोलकर, सतीश परब, दयानंद नाईक, आमोणकर आदी उपस्थित होते.प्रसाद उमर्ये व सहकारी शिक्षकांनी दिवसभर कार्यशाळेत संस्कृत कशाप्रकारे शिकवण्यात यावे याचे मार्गदर्शन केले. दयानंद नाईक यांनी स्वागत केले. राजेश पित्रे यांनी सूत्रसंचालन केले. दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. (प्रतिनिधी)फोटो ओळी-डिचोलीत संस्कृत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपसभापती अनंत शेट. सोबत प्रसाद उर्मय, सतीश परब व इतर. (विशांत वझे)