बहिणाबाई विद्यालयात १०वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST
जळगाव : येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात नुकताच एसएससीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे, जनार्दन रोटे, अशोक राणे, मुख्याध्यापक टी.एस.चौधरी, प्रतिभा खडके आदी उपस्थित होते.
बहिणाबाई विद्यालयात १०वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
जळगाव : येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात नुकताच एसएससीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे, जनार्दन रोटे, अशोक राणे, मुख्याध्यापक टी.एस.चौधरी, प्रतिभा खडके आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक टी.एस.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेतील सूचना वाचून दाखविल्या व बारकोड होलोक्राफ्ट कसे चिटकावे याबद्दल माहिती दिली. बंडू काळे, दिनेश चौधरी, संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.डॉ.विलास नारखेडे, राजेश वाणी, सीमा चौधरी, डॉ.प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, विशाल पाटील इ.नी मोलाचे सहकार्य केले. निरोप समारंभानंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन करून निरोप देण्यात आला.