शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी दिल्लीत डेंग्यूचा कहर

By admin | Updated: September 16, 2015 02:22 IST

येथे मागील आठवड्यात सात वर्षांच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर आणखी एका सहा वर्षांच्या मुलाचा व २९ वर्षीय महिलेचा डेंग्यूने बळी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : येथे मागील आठवड्यात सात वर्षांच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर आणखी एका सहा वर्षांच्या मुलाचा व २९ वर्षीय महिलेचा डेंग्यूने बळी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. श्रीनिवासपुरी भागातील अमन शर्मा या मुलाचा व एका महिलेचा मंगळवारी मृत्यू झाल्याने डेंग्यूचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हॉस्पिटल्सना इशारा दिला आहे की, जे हॉस्पिटल डेंग्यूचा रुग्ण दाखल करून घेणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. केजरीवाल यांनी दोन हॉस्पिटलमध्ये अचानक भेट देऊन पाहणी केली. डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली सरकारला केल्या आहेत. आतापर्यंत डेंग्यूचे दोन हजार संशयित रुग्ण तपासणीसाठी दाखल झाले आहेत. ‘त्या’ कुटुंबाला मदतअविनाश या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर या मुलाचे आई-वडील लक्ष्मण राऊत आणि बबिता यांनी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर आज ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पीडित परिवाराला तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुलाच्या मृत्यूची दंडाधिकाऱ्यामार्फत चौकशीअविनाश राऊत या सात वर्षीय मुलाला डेंग्यू झाल्यानंतर पाच रुग्णालयांनी त्याला दाखल करवून न घेतल्याप्रकरणी दिल्ली सरकारने दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केले.मूलचंद, मॅक्स साकेत, साकेत सिटी, आकाश आणि आयरीन या पाच रुग्णालयांना या मुलाला दाखल करवून न घेतल्याबद्दल तुमच्या रुग्णालयाची नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटिस बजावली आहे. ८ सप्टेंबर रोजी अविनाशचा मृत्यू झाल्यानंतर दु:खावेग सहन न झाल्यामुळे त्याच्या मातापित्यांनी दक्षिण दिल्लीच्या लाडो सराय या चार मजली इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती.