डेंग्यूसदृश्य साथप्रश्नी लोटेवाडीत आरोग्य अधिकार्यांची पहाणी
By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST
गारगोटी : लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांना मागील काही दिवसापासून डेंग्यूसदृश्य आजाराने विळखा घातला आहे. बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी नांद्रेकर यांनी गावाची पाहणी करून ग्रामसेवक सरपंच यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या. या संदर्भात काल गुरुवारी गावसभा बोलविली होती. परंतु या गावभेला ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी पाठ फिरवली.
डेंग्यूसदृश्य साथप्रश्नी लोटेवाडीत आरोग्य अधिकार्यांची पहाणी
गारगोटी : लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांना मागील काही दिवसापासून डेंग्यूसदृश्य आजाराने विळखा घातला आहे. बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी नांद्रेकर यांनी गावाची पाहणी करून ग्रामसेवक सरपंच यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या. या संदर्भात काल गुरुवारी गावसभा बोलविली होती. परंतु या गावभेला ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी पाठ फिरवली.या गावात दूषित पिण्याचे पाणी व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे डेंग्यूसदृश्य रोगाची लागण झाली आहे. अनेक नागरिक ताप, डोकेदुखी, अशक्तपणा या आजाराने ग्रस्त झाले आहेत. बरेच रुग्ण खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये वाढ होत आहू. गावाला पाणी पुरवठा करणार्या योजनेत अनेक त्रुटी व लोकांच्यात आरोग्याविषयी जागृतीचा अभाव असल्याने हा रोग पसरत आहे. म्हणून मिणचे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रिंडे यांनी या ग्रामपंचायतीला तोंडी व लेखी कल्पना देऊनही यात कोणतीही सुधारणा प्रशासनाने केली नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली. आरोग्य खात्याने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन डॉ. नांद्रेकर यांनी गावास भेट दिली. त्यावेळी त्यांनी ग्रा. पं. पदाधिकारी, ग्रामसेवक यांना माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.यासंदर्भात सरपंच संजय कांबळे यांची सभा बोलविली पण ग्रामस्थ व सदस्यांनी पाठ फिरवली त्याचबरोबर आरोग्य अधिकार्यांनीही गावाला भेट दिली नाही.दरम्यान याबाबत ग्रामस्थांना विचारले असता ते म्हणाले, गावातील दोन लग्न समारंभ परगावी असल्याने ग्रामस्थांनी गावसभेकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले.