शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निदर्शने भाजपा : महिलांचा अवमान केल्याचा आरोप

By admin | Updated: October 6, 2016 21:20 IST

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माफी मागावी या मागणीसाठी आक्रमक होत भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना महिलांची नळावरील भांडणे असा उल्लेख करणार्‍या सुप्रिया सुळे यांनी महिलांचा अवमान केला असून, त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणीही आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माफी मागावी या मागणीसाठी आक्रमक होत भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना महिलांची नळावरील भांडणे असा उल्लेख करणार्‍या सुप्रिया सुळे यांनी महिलांचा अवमान केला असून, त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणीही आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.सुळे या बुधवारी नाशिकमध्ये आल्या असता त्यांनी मुख्यमंत्री चीडचीड करतात, अशी टीका केली होती. यापूर्वी अहमदनगर आणि अन्य ठिकाणीही त्यांनी अशीच टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी सुप्रिया सुळे माफी मागा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार फरांदे यांनी मोर्चेकर्‍यांसमोर बोलताना सुप्रिया सुळे यांनी महिलांचा अवमान केला असून, हातातून सत्ता गेल्याने त्याच चीडचीड करीत आहेत, अशी टीका केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात भाजपाचे शहर सरचिटणीस सुरेश पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे तसेच भाजयुमोचे अध्यक्ष अजिंक्य साने, अमित घुगे, रोहिणी नायडू, देवदत्त जोशी, सुजाता करजगीकर, भारती बागुल, उत्तमराव उगले, पवन भगूरकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, दिगंबर धुमाळ, विजय गायखे, दिनेश अहिरे, ॲड. प्रसाद महाले, सुमित नहार, राहुल पंडित, स्मीता बोडके, विजय बिरारी, हिमगौरी आडके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.भाजपाचा कांगावा प्रसिद्धीसाठीदरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांचा कोणताही अवमान केला नसताना भाजपाच्या वतीने चुकीचे आंदोलन करण्यात येत आहे. भाजपाच केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचे आंदोलन करीत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी केला आहे.