ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - आप सराकार विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली.
हे निदर्शन वीजदर वाढीच्या विरोधात असून भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या फवा-याचा वापर करावा लागला. सत्तेवर येण्यापूर्वी केजरीवाल यांनी वीजेच्या दरात वाढ होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. परंतू, सत्तेवर येताच त्यांनी वीजदर वाढवत जनतेची फसवणूक केली आहे. जनतेला वीज पुरवठा होत नाही कारण वीज वितरणामध्ये ४९ टक्के समभाग हे खासगी कंपन्यांचे आहेत. जनतेची आश्वसनं पूर्ण करण्यास आप सरकार पूर्णतः अयशस्वी ठरले असल्याचेही भाजपा गट प्रमुख सतीश उपाध्याय यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन कमिशनने वीज दर वाढीवर शिक्कामोर्तब केले असून तीन वीज वितरक कंपन्यांमार्फत सहा टक्क्यांपर्यंत दरवाढ होणार आहे. ही दरवाढ १५ जून पासून लागू होणार असून तीन महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ती लागू होणार आहे.